‘या’ चॅनेलच्या मालकाचा संशयास्पद मृत्यू

आंध्र प्रदेश :  वृत्तसंस्था – आंध्र प्रदेशातील एक्सप्रेस टीव्ही या खासगी तेलुगू चॅनेलच्या मालकाचा संशयास्पद मृत्यू झाला. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. चिगुरपति जयराम असे या मालकाचे नाव आहे. ते कोस्टल बँकेचे कार्यकारी संचालक देखील आहेत. ही घटना आज (शुक्रवार) सकाळी राष्ट्रीय महामार्ग ६५ वर उघडकीस आली.

चिगुरपति जयराम यांचा मृत देह त्यांच्या कारमध्ये आढळून आला आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या कारचा चालक देखली बेपत्ता आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पुढील तपास सुरु केला असून जयराम यांचा अपघाती मृत्यू झाला कि त्यांचा खून करण्यात आला हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील वरील नंदिगाव मंडल येथे त्यांची कार रस्त्याच्या बाजूला बेवारस आढळली. जयराम यांचा मृत्यू अपघातामुळे झाला की त्यांची हत्या करण्यात आली. याबाबत पोलीस तपास करत आहेत. पोलिसांनी राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासणीला सुरुवात केली आहे.