सिगरेटच्या पैश्यावरून तरुणावर खुनी हल्ला

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – सिगारेटचे जास्त पैसे घेतल्याच्या वादातून एकावर खुनी हल्ला केल्याची घटना भोसरी येथे शुक्रवारी रात्री घडली. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी ऋषीकेश सुरेश पवार (21, रा. कदमवाक वस्ती, लोणी काळभोर) याने फिर्याद दिली आहे. तर दत्तात्रय राजेंद्र धायगुडे (26, रा. कदमवाक वस्ती, लोणी काळभोर) हा जखमी झाला असून त्याच्यावर मॅक्स न्यूरो हॉस्पिटल कासारवाडी येथे उपचार सुरू आहेत. अजय चव्हाण आणि किरण पवार या दोघांना ताब्यात घेतले आहे. प्रमोद वाघमारे, किशोर पवार व त्यांचे 3 ते 4 साथीदार सर्व (रा. भोसरी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व जखमी इसम यांचे मध्ये सिगारेटचे जास्त पैसे देण्यावरून बाचाबाची झाली. फिर्यादी यांनी जखमी दत्तात्रय यास गाडीत बसवले असता किशोर पवार याने त्यांचे गाडीवर दगड मारून काच फोडली. याचा जाब विचारण्यासाठी फिर्यादी व त्यांचे मित्र गाडीबाहेर आले असता आरोपींनी दत्तात्रय यास लाकडी दांड्याने डोक्यात मारून जखमी केले. ते पळुन जात असताना आरोपीनी त्यांना खाली पाडून डोक्यात दगड, विटा व लाकडी दांड्याने मारून जखमी करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तपास भोसरी पोलिस करत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

Loading...
You might also like