मित्राच्या डोक्यात दगड घालून खुन; पुणे ग्रामीण पोलिसांनी तासात लावला छडा

शिक्रापूर – शिरुर तालुक्याच्या शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीतील सणसवाडी ,डिंग्रजवाडी येथे एका व्यक्तीचा मृतदेह आढळला होता.सदर व्यक्तीचा डोक्यात मोठा दगड घालून खून करण्यात आला होता.कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून दगडाने डोक्यात, चेहऱ्यावर , कपाळावर मारहाण करून जबर जखमी करून जिवे ठार मारले होते.हा खून कुणी केला याबाबत पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते.मात्र पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा व शिक्रापूर पोलिसांनी १ तासांच्या आतच गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,सणसवाडी चे पोलिस पाटिल यांनी फिर्याद दिली की, मौजे डिंग्रजवाडी, ता.शिरूर जि.पुणे. गावचे हद्दीत साठेवस्तीचे कॅनाॅलचे कच्चे रोडवर लालदेव उर्फ लालसींग बिरीष मांझी (वय 40 ते 45 वर्षे रा. साठेवस्ती,सणसवाडी ता.शिरूर जि.पुणे. मुळ रा.म्हसारी, थाना- संपाचक,जिल्हा – पटना, राज्य – बिहार) यास कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून दगडाने डोक्यात, चेहऱ्यावर , कपाळावर मारहाण करून जबर जखमी करून जिवे ठार मारले आहे त्याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खुनाचा गुन्हा दाखल केलेला आहे.

सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा क्रूरपणे केला असल्याने पोलीस अधीक्षक डाॅ.अभिनव देशमुख व अपर पोलीस अधीक्षक मिलींद मोहिते,उप विभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांनी सदरचा गुन्हा तात्काळ उघडकीस आणणे कामी स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक श्री. पद्माकर घनवट व पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांना सुचना दिल्या.

सदर पथकास गोपनीय बातमीदाराकडून बातमी मिळाली की, मयत इसम नामे लालदेव उर्फ लालसिंग याच्यासोबत काम करणारा त्याचा मित्र शिवराज घंटे सोबत भांडण झाले होते त्यावरून स्था.गु.शा.पथकाने शिवराज बंडुराव घंटे(रा. हंगरगा, ता. तुळजापूर, जि.उस्मानाबाद, सध्या रा. सोनाईमळा, सणसवाडी, ता. शिरूर, जि. पुणे) यास त्याचे कामाच्या ठिकाणावरून गुन्हा दाखल झाल्यापासून 1 तासाचे आत शिताफीने ताब्यात घेवून चौकशी केली असता त्याने कामाचे ठिकाणी झालेल्या भांडणावरून लालदेव उर्फ लालसिंग यास दारू पाजून हाताने मारहाण करून जमीनीवर खाली पाडून डोक्यात दगड घालून खून केला असल्याचे सकृतदर्शनी निश्पन्न झालेने त्यास स्था.गु.शा व शिक्रापूर पोलिस स्टेशन यांचे संयुक्त पथकाने ताब्यात घेतले.

सदरचा गुन्हा पोलीस अधीक्षक डाॅ.अभिनव देशमुख व अपर पोलीस अधीक्षक मिलींद मोहिते, उप विभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट,पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे,स्थानिक गुन्हे शाखा येथील सहा. पोलीस निरीक्षक सचिन काळे, सहा.फौज. शब्बीर पठाण, पो.हवा. मुकुंद अयाचित, उमाकांत कुंजीर, हनुमंत पासलकर, पो.ना.राजु मोमीन, चंद्रकांत जाधव, अजित भुजबळ, पो.काॅ.प्रसन्नजीत घाडगे, पो.हवा.मुकुंद कदम,प्रमोद नवले,शिक्रापूर पो.स्टे. येथील स.पो.नि.स्वामी,अतकरे, साळुंके, पो.स.ई.राजेष माळी, खटावकर, पो.हवा.सचिन मोरे, अमिर चमनषेख, सचिन होळकर,दत्ता षिंदे, पंडीत मांजरे, पो.ना.दांडगे, योगेष नागरगोजे, गणेष कर्पे, षंकर साळुंके, पो.काॅ.किषोर शिवणवकर, अमोल नलगेे, राहुल वाघमोडे, निखील रावडे, जयराज देवकर यांनी उघडकीस आणला.

सदर गुन्हयाचा पुढील तपास स.पो.नि.वैभव स्वामी व पो.हवा. प्रशांत गायकवाड हे करीत आहेत.