चारित्र्याच्या संशयावरून बायकोनेच केला नवऱ्याचा खून

काही तासातच तासगाव पोलिसांनी खुनाचा केला उलघडा

तासगाव : पोलीसनामा ऑनलाईन (राजू थोरात) – दत्त माळावरील इंदिरानगर झोपडपट्टीमध्ये घर नंबर १११ मध्ये काल (दि २० रोजी) रात्री ९ वाजता कल्लाप्पा उर्फ कल्लू शिवाजी बागडी (वय ४०) हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्याच वेळी मयत कल्लू बागडी यांची पत्नी शांताबाई कल्लाप्पा उर्फ कल्लू बागडी (वय ३५) यांनी तासगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली की, नवरा कल्लू बागडी यांनी आत्महत्या केली आहे . त्यानुसार तासगाव पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी मिरज येथील शासकीय दवाखान्यात पाठवण्यात आले.

शवविच्छेदनाच्या अहवालानंतर पोलिसांनी जलद गतीने तपास चालू केला. पोलिसांच्याही लक्षात आले की, ही आत्महत्या नसून खून आहे. त्यानुसार मयत कल्लू बागड़ी यांची पत्नी शांताबाई यांची कसून चौकशी केली असता तिने गुन्हा कबूल केला. माझा नवरा दारू पित होता तसेच तो माझ्यावर चारित्र्याचा सशंय घेवून वारंवार त्रास देत होता. नवरा टी बी ने आजारी असलेमुळे मी त्यास दारू पिऊ नको असे सांगत असताना याचा राग मनात धरून त्यांनी माझ्याशी भांडण करून मी जिव देतो असे म्हणुन तो घरातुन बाहेर पडला, त्यावेळी तो त्याचे जिवाचे बरे वाईट करून घेईल म्हणुन मी त्याचे मागे गेले त्यावेळी, तु येथे का आली आहेस म्हणून भाडुं लागला. मी त्याला समजावत असताना त्याने त्याचे हातातील चाकु माझ्या गळ्याजवळ लावला. त्यावेळी झालेल्या झटापटीत त्याचे गळ्यावर पहिला वार झाला. त्याचक्षणी  तिने दुसरा वार करून खून केला अशी कबूली तीने दिली आहे.

या गुन्ह्याच्या तपास अशोक बनकर उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अजय सिंदकर, स.पो.नि उमेश दंडीले, पो.उ.नि मदने, भाऊसाहेब तिटकरे, सचिन घाटके, मोहन वंडे, शरद निकम, जोतीराम पवार, सतीश लाटने, स.पो.फौ थोरावडे, विलास मोहिते, दरिबा बंडगर, सोमनाथ गुंडे, विनोद सकटे, महिला प्रज्ञा जाधव, चालक संदीप गुरव तासगांव पोलीस ठाणे यांनी सदर गुन्हा कौशल्य पुर्वक तपास करून उघडकीस आणून त्यातील हल्लोखोर पत्नीसा अटक केली आहे.

You might also like