पुतण्या-भावजयचा खून करणारा आरोपी दीर गजाआड

सांगली/शिराळा : पोलीसनामा ऑनलाइन – किरकोळ वादातून दोन वर्षाच्या पुतण्याचा आणि भावजयचा खून करणाऱ्या दिराला पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार सोमवारी (दि.९) उघडकीस आला होता. अविनाश योगेश चव्हाण (वय-२) आणि जयश्री योगेश चव्हाण (वय-२४) असे खून झालेल्यांची नावे आहेत. सुरेश दिनकर चव्हाण असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पनवेल येथील कामोठी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश चव्हाण आणि योगेश चव्हाण हे दोघेजण पनवेळ येथील कामोठे येथे वास्तव्यास आहेत. सुरेश हा मोठा भाऊ असून देखील त्याचे अद्याप लग्न झाले नाही. मात्र, योगेश याचे तीन वर्षापूर्वी लग्न झाले असून त्याला दोन वर्षाचा मुलगा आहे. लहान भाऊ असून देखील त्याचे लग्न झाल्याची सल सुरेशच्या मनात होती. योगेश कामधंदा करत होता तर सुरेशला कोणतेच काम नसल्याने त्याचे लग्न ठरत नव्हेत. तो नेहमी घरामध्ये असायचा.

सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास नेहमीप्रमाणे योगेश कामावर गेला होता तर सुरेश घरामध्ये होता. सुरेश आणि जयश्रीचे किरकोळ कारणावरून वाद झाले. याच वादातून सुरेशने पाचच्या सुमारास पुतण्या आणि भावजयचा गळा आवळून खून केला. योगेश रात्री अकराच्या सुमारास घरी आला असता हा प्रकार उघडकीस आला. सुरेशने पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला आहे.

You might also like