पोलिस निरीक्षक, सहाय्यक निरीक्षकासह 5 जणांवर खुनाचा गुन्हा दाखल; प्रचंड खळबळ

गोंदिया : पोलीसनामा ऑनलाइन –  चोरीच्या प्रकरणात (Theft case)अटक करण्यात आलेल्या आरोपीचा पोलीस कोठडीत मृत्यु झाल्याप्रकरणी आमगाव येथील पोलीस निरीक्षकासह पाच पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजकुमार अभयकुमार धोती (वय ३०, रा. कुंभारटोली) याच्यासह राजकुमार गोपीचंद मरकाम (वय २२), सुरेश धनराज राऊत (वय ३१) यांना आमगाव जिल्हा परिषदे शाळेत चोरी केल्याप्रकरणी(Theft case) पकडले होते. त्यांच्याबरोबर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले होते. पोलीस कोठडीत असताना २२ मे रोजी पहाटे सव्वापाच वाजता यातील मुख्य आरोपी राजकुमार धोती याचा कोठडीत मृत्यु झाला होता. याचा तपास सीआयडीकडे सोपविण्यात आला होता.

प्राथमिक चौकशीच्या आधारावर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी पोलीस निरीक्षकासह चौघांना निलंबित केले होते. त्यामुळे निरीक्षक सुभाष चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक महावीर जाधव, पोलीस हवालदार खेमराज खोब्रागडे, पोलीस शिपाई अरुण उईके आणि कांबळे यांचा समावेश होता.

पोलीस कोठडीत असलेल्या आरोपीची प्रकृती खालावल्याचे ड्युटीवर असलेल्या कर्मचार्‍याच्या हे लक्षात आले. त्यानंतर त्याने ही बाब वरिष्ठांना कळविले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला ग्रामीण रुग्णालयात नेले. परंतु, उपचारापूर्वीच त्याला मृत्यु झाला होता. याप्रकरणात पोलीस ठाण्यातील कार्यरत कर्मचार्‍यांच्या जबाबावरुन केलेल्या चौकशीत चव्हाण यांनी कोठडीमध्ये आरोपी असताना त्यांच्याकडे केलेले दुर्लक्ष आणि योग्य कर्मचारी यांची न केलेली देखरेख असे अनेक मुद्दे उपविभागीय अधिकारी यांनी सादर केलेल्या अहवालात आढळून आल्याने त्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले होते. सीआयडीचे पोलीस निरीक्षक वाकडे यांनी तपास करुन याप्रकरणी फिर्याद दिली असून त्यानुसार पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

 

नव्या नियमानुसार आता व्हॉट्सअप आणि फोन कॉलवर नजर ठेवणार सरकार? जाणून घ्या सत्य

‘या’ 7 गोष्टींचं सेवन केल्यानंतर लगेचच चुकूनही पिऊ नका पाणी, होऊ शकते मोठे नुकसान, जाणून घ्या

Pune : ‘गँगस्टर गज्या मारणे कोण आहे माहिती आहे का? मिरवणुक आम्हीच काढली होती’; मारहाण करून सावकारी करणारा ‘गोत्यात’

Black fungus : कोरोनाच्या उपचारात महागात पडत आहे ‘ही’ चूक, ब्लॅक फंगसचे ठरत आहे कारण, जाणून घ्या

Pune : दुर्दैवी ! विष प्राशन करून विवाहितेची आत्महत्या, बारामती तालुक्यातील घटना

High Cholesterol Warning Signs : हात, डोळे आणि त्वचेवर दिसतात हाय कोलेस्ट्रॉलची ‘ही’ 3 लक्षणं, जाणून घ्या