Murder Case | तरुणाचा खून करून पुरावा नष्ट करणारे मित्र अखेर अटकेत; पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाई

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन –  सहा महिन्यापूर्वी एका 23 वर्षीय तरुणाचा (23-year-old) अनैतिक संबधाच्या संशयावरून त्याच्याच मित्रांनी खून (Murder Case) करून पुरावा नष्ट केला होता. या घटनेनंतर फरार आरोपींना पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अकलूज येथून जेरबंद केल्याची माहिती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली.

अजय उर्फ प्रदिप प्रकाश खरात (वय 20 वर्षे) आणि प्रमोद प्रताप खरात (वय 21 दोघेही रा. माळशिरस) असे अटक केलेल्यांची नावे आहेत.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

गणेशवाडी (ता. इंदापूर) येथील भिमानदी पात्रात 23 वर्षीय तरुणाचा अनैतीक संबंधाच्या संशयावरून त्याच्याच मित्रांनी खून (Murder Case) केला होता.
त्यानंतर धारदार शस्त्राने दोन्ही हात, पाय व धडावेगळे करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता.
17 जानेवारीला ही घटना घडली होती.
या प्रकरणानंतर दोन्ही आरोपी फरार होते.
याबाबत तरुणाची आई मंजुषा महादेव गोरवे (वय 51 वर्षे रा.टाकळी) यांनी इंदापूर पोलिसांत (Indapur Police) फिर्याद दिली होती.
त्यानुसार दोन्ही आरोपींना अकलूज येथे सापळा रचून गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करून पुढील तपासासाठी इंदापूर पोलीसांच्या ताब्यात दिले.
इंदापूर पोलीसांनी सदर आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता आरोपींना 18 जून पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

 

Web Title : Murder Case : pune rural police arrest criminals

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

DSK Builder Case | 32 हजार ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक ! बिल्डर डीएसकेंचा मुलगा शिरीष कुलकर्णींचा जामीनासाठी अर्ज