‘तिच्या’ ब्लाऊजच्या बटणवरून बारामतीतील खूनाचे गुढ उकलले, महिलेसह अनैतिक संबंध ठेवणरा ‘गोत्यात’ !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बारामती तालुक्यातील मेडद गावाजवळ एका मृतदेहाशेजारी महिलेच्या कपड्याचे बटण, ओढणी, बांगडी, गोफ, दुचाकी अशा वस्तू आढळून आल्या होत्या. कपड्याच्या बटण, अनैतिक संबंधावरुन हा खून झाल्याचे उघडकीस आणण्यात बारामती तालुका पोलिसांना यश आले आहे. ट्रॅक्टरचालक वैभव सुनिल लोंढे (वय २२, रा. मेखळी, ता. बारामती) याचा खून झाल्याचे उघडकीस आले असून याप्रकरणी पोलिसांनी गणेश जगन्नाथ कोळी (वय ३१, रा. माळेगाव) याच्यासह एका महिलेला अटक केली आहे.

वैभव लोंढे हे वास्तूशांतीला जाण्यासाठी बुधवारी २१ ऑगस्टला दुपारी घराबाहेर पडले होते. त्यानंतर रात्री त्यांनी पत्नीला फोन करुन आपल्याला येण्यास उशीर होईल असे सांगितले होते. त्यानंतर त्यांचा मोबाईल बंद झाला. दरम्यान मेडद गावाजवळ पोलिसांनी गुरुवारी एक मृतदेह आढळून आला. या मृतदेहाशेजारी शर्टची बटणे, बांगडी/गोट, दुचाकी, दुचाकीची चावी पडलेली होती. दुचाकीच्या क्रमांकावरून त्यात वैभव सुनील लोंढे यांचा खून झाल्याचे उघड झाले. मात्र, तरीही त्याचे मारेकरी हाताला लागत नव्हते.

पोलिसांनी घटनास्थळी मिळालेली काही तुटलेली बटणे व खून करण्यासाठी फास दिलेली ओढणी यावरुन तपास करण्यास सुरुवात केली. ही बटणे महिलेच्या कपड्याची असल्याचे आढळून आले. अशा प्रकारची बटणे एका लेडीज टेलरकडे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरुन कोणत्या महिलेच्या कपड्यांना ही बटणे वापरली होती, याचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले. त्यातून ट्रॅक्टरचालकाचा खून केलेल्या महिलेचे नाव निष्पन्न झाले. हा खून अनैतिक संबंधातून झाल्याचे उघड झाले.

अटक केलेल्या महिलेचे लोंढे आणि गणेश टिकोळे या दोघांबरोबर अनैतिक संबंध होते. बुधवारी या महिलेने लोंढे याला बारामती बसस्थानकावर बोलावून घेतले होते. लोंढे याची वाट पहात ही महिला उभी असताना टिकोळे हा तेथे आला. टिकोळेच्या दुचाकीवर बसून ही महिला जाऊ लागली. त्यावेळी लोंढे बसस्थानकावर आला. त्याने तिला टिकोळेच्या दुचाकीवरुन जाताना पाहिले. त्याने त्यांचा पाठलाग सुरु केला. टिकोळे माळेगावला जाताना मेडद येथे लोंढे याने त्यांना गाठले. दोघांना अडवून त्याने तिच्याकडे जाब विचारला. यावेळी त्यांच्या झालेल्या बाचाबाचीमध्ये दोघांनी मिळून लोंढे याचा गळा आवळून खून केला.

खून करण्यापूर्वी झालेल्या बाचाबाचीत या महिलेच्या कपड्याची बटणे तुटून पडली होती. तसेच ओढणीही तेथेच सापडली होती. घटनास्थळावरुन मिळालेल्या पुराव्यावरुन पोलीस मारेकऱ्यांपर्यंत पोहचले.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like