अनैतिक संबंधात अडथळा ! पत्नीसह चुलत भावानेच केली हत्या

औरंगाबाद : पोलीसनामा पोलीसनामा – पैठण तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. तर ४ महिन्यानंतर या हत्येचा खुलासा झाला आहे. तर अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्या कारणाने पत्नीसह चुलत भावानेच काटा काढला आहे. त्या दोघांनी मृत रघुनाथ घोंगडे (वय, ३५) याच्या डोक्यात दगड घालून खून केला. त्यानंतर मृतदेह पडीक शेतात पुरून टाकला. ह्या घटनेचा प्रकार दि.१५ एप्रिल रोजी उघडकीस आला. यावरून, पत्नी यशोदा रघुनाथ घोंगडे (वय ३०) सह चुलत भाऊ दत्तात्रय उर्फ शिवाजी घोंगडे (वय ४०) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

अधिक माहितीनुसार, बालानगर येथे गट क्रमांक १७ ही राधाबाई घोंगडे यांची पडीक जमिनीची मशागत करण्यासाठी दि.१५ एप्रिल रोजी वाल्मीक घोंगडे हा शेतात काम करत असताना त्याला एका जागेवर भुसभुशीत जमीन लागून हाड वर आले. त्यामुळे त्याने तात्काळ काम थांबवत ही माहिती गावातील पोलिस पाटलांना दिली. त्यांनी घटनास्थळी जात पाहणी करत ही माहिती पोलिस ठाण्याला दिली. त्यानुसार प्रशिक्षणार्थी आयपीएस गोरख भामरे, सहायक पोलीस निरीक्षक अर्चना पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी शोध घेतला असता जमिनीत मानवी हाडाचा सांगाडा सापडला. त्या खड्ड्यात सापडलेल्या काही वस्तूंवरून हा सागडा गावातून ४ महिन्यापासून गायब असलेल्या रघुनाथ भाऊसाहेब घोंगडेचा (वय ३५) असल्याचे निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणावरून त्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेसह एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. चौकशीदरम्यान त्या दोघांनी मृत रघुनाथ हा अनैतिक संबंधात अडसर येत असल्याने त्याचा मकर संक्रांतीच्या ८ दिवस आधी हत्या केल्याची कबुली दिली. या खूनाचा तपास पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक गोरख भांबरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पीआय भागवत फुंदे, सपोनि अर्चना पाटील, फौजदार संदीप सोळंके, सह बीट जमदार खंडू मंचरे, यांनी केली आहे.