Pune : पुण्यात खूनाची मालिका सुरूच, कोंढव्यात तरूणाचा दगडाने ठेचून खून, परिसरात खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील खूनाची ‘मालिका’ थांबत नसून कोंढव्यात एका तरुणाचा पूर्ववैमन्यास्तून दगडाने ठेचून खून केल्याची घटना समोर आली आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून, तपास सुरू करण्यात आला आहे.

विठ्ठल दांडे (वय 35, रा. कोंढवा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दांडे याच्या यातील आरोपींसोबत पूर्वीचे वाद होते. आज सायंकाळी ते दारू पिण्यास येथील कृष्णानगर भागात बसले होते. यावेळी त्यांच्यात वाद झाला. यावेळी आरोपींनी त्याचा दगडाने ठेचून खून केला. माहिती मिळताच कोंढवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गुन्हे शाखेची पटगॆ देखील दाखल झाली असून, आरोपींचा माग काढण्यात येत आहे. अधिक तपास सुरू आहे