कलयुग ! सुनेसोबत सासर्‍याचं झेंगाट; हैवान बनत प्रस्थापित केले अनैतिक संबंध अन् तरूण मुलाची केली हत्या

जैसलमेर : वृत्तसंस्था –  राजस्थानच्या जैसलमेर येथे नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली. एका सासऱ्याचे त्याच्या सूनेवर प्रेम जडले होते. मात्र, त्यामध्ये मुलगा अडसर ठरत होता. म्हणून निर्दयी बापाने आपल्या तरुण मुलाची हत्या केली. ही घटना 15 दिवसांपूर्वी घडली होती. पोलिसांनी तपास केल्यानंतर आता ही घटना समोर आली.

याबाबत नाचना पोलिस उपायुक्त हुकमा राम बिश्नोई यांनी सांगितले, सासरा आणि सूनचे प्रेमसंबंध जुळले होते. पण मुलगा हिरालाल यामध्ये अडसर ठरत होता. त्यानंतर त्या महिलेने तिच्या पतीला लिंबू सरबत दिला. त्यामध्ये तिने झोपेच्या गोळ्या टाकल्या होत्या. त्यानंतर सासरा आणि सूनेने मिळून हिरालालची करंट देऊन हत्या केली. त्यानंतर हिरालालचा मृत्यू शॉक लागल्याने झाल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, जेव्हा पोलिसांना याची माहिती मिळाली. तेव्हा तपास केला आणि सत्य प्रकरण समोर आले.

हिरालालच्या भावाने पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी हिरालालच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला. तपासाच्या 10 दिवसानंतर मृतदेह कबरेतून बाहेर काढण्यात आला आणि शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. त्याचा अहवाल आल्यानंतर पत्नी आणि हिरालालच्या बापाला अटक करण्यात आली आहे.