घटस्फोटीत पत्नीच्या प्रियकराच्या खूनाने प्रचंड ‘खळबळ’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मुंबईत एका व्यक्तीला माजी पत्नीच्या प्रियकराच्या हत्याप्रकरणात अटक करण्यात अली आहे. मुंबईतील गोवंडी परिसरात हि घटना शनिवारी पहाटे घडली. समिउल्लाह फारुकी असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी झुबेर खान याला अटक केली आहे.

या  हत्येनंतर अवघ्या तीन तासात पोलिसांनी आरोपीला अटक केली. समिउल्लाह फारुकी याचे झुबेर खान याच्या माजी पत्नीशी  प्रेमसंबंध होते. तो तिला भेटायला गेला असता आरोपी झुबेरसह चार ते पाच जणांनी त्याच्यावर हल्ला चढवत त्याला जबर जखमी केले त्यानंतर चाकूने भोकसून त्याचा खून करण्यात आला. त्याला उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

दरम्यान, पोलिसांनी या हत्याप्रकरणात आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आरोग्यविषयक वृत्त