धक्कादायक ! फक्त 200 रूपयांसाठी खून

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भांडणासाठी अनेकदा काहीही कारण पुरते. पण अनेकदा किरकोळ कारणावरुन सुरु झालेली भांडणे विकोपास जातात आणि त्यातून मोठ्या घटना घडतात. असाच काहीसा प्रकार बांद्रा येथे घडला. २०० रुपये चोरल्याच्या आरोपावरुन वादावादीत एकाने तरुणाला गटारात फेकून दिल्याचे त्याचा मृत्यु झाला.

निर्मलनगर पोलीसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना बांद्रा जुने टर्मिनसमोरील चामडावाडी नाल्याच्या कट्ट्यावर बुधवारी रात्री ८ वाजता घडली.

रमेश कंद्रीवेल शेट्टी (वय २५) असे खुन झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पेरीया मनीअर्जुन स्वामी (वय २६, रा. इंदिरानगर, बांद्रा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांचा मावस भाऊ रमेश शेट्टी याच्यावर एकाने २०० रुपये चोरल्याचा आरोप करुन वाद घातला. त्याला शिवीगाळ करुन त्याचे दोन्ही पाय धरुन त्याला नाल्यामध्ये फेकून दिले. त्यात त्याचा मृत्यु झाला. निर्मलनगर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

फेसबुक पेज लाईक करा – 

You might also like