Jalna News : मारहाण केल्याचा राग मनात धरून चुलत भावनेच केला भावाचा खून

मंठा (जि. जालना) : पोलिसनामा ऑनलाईन –  पैसे दिले नाही म्हणून मारहाण केल्याचा राग मनात धरून चूलत भावानेचा भावाचा खून केल्याची घटना घडली. ही घटना मंठा शहरातील शासकीय गोदामाजवळ रविवारी सकाळी उघडकीस आली. अमोल मारोती रणभवरे (वय २२ रा. मंठा) असे मयताचे नाव आहे. या प्रकरणी संशयित म्हणून सचिन बबन रणभवरे (२३ रा. मंठा) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक महिती अशी की, अमोल रणभवरे हा औरंगाबाद येथे मावशीकडे राहतो. शनिवारी तो मंठा येथे चुलते अंबादास रणभवरे यांच्याकडे आला होता. अमोलने सायंकाळी दारू पिऊन चुलत्याकडे पैशांची मागणी केली. त्यांनी पैसे न दिल्याने वाद घालून तो निघून गेला. रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास अमोल आणि त्याचा चुलत सचिन रणभवरे यांची मंठा फाट्यावरील शासकीय गोदामाजवळ भेट झाली. अमोलने सचिनकडे पैशांची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिल्याने अमोलने सचिनला मारहाण केली.

त्यानंतर सचिन हा घरी निघून गेला. मारहाण झाल्याचा राग मनात धरून सचिन पुन्हा मंठा फाट्यावर गेला. त्याने अमोलला झाडाची फांदी तोडून मारहाण केली. यात अमोल गंभीर जखमी झाला. त्यानंतर सचिन घरी निघून गेला. गुरूवारी सकाळी सचिन पुन्हा शासकीय गोदामाजवळ आला. त्याला अमोल मृत अवस्थेत दिसला. त्याने याची माहिती चुलते अंबादास रणभवरे यांना दिली.

त्यानंतर पोलिसांना कळविण्यात आले. पोलीस निरीक्षक विलास निकम, पोलीस उपनिरीक्षक नितीन गट्टूवार, ए.जे. शिंदे, पोलीस कॉ. श्याम गायके, केशव चव्हाण, देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी अंबादास बाबुराव रणभवरे यांच्या फिर्यादीवरून मंठा पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, माहिती मिळल्यानंतर पोलीस उपविभागीय अधिकारी इंदलकर बहुरे यांनी घटनास्थळाची पाहणी केली.पुढील तपास पोलीस निरीक्षक विलास निकम हे करीत आहेत.