शेतीच्या वादातून शेतकऱ्याचा लोखंडी सळईने खून

दोघांना अटक

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन – शेतजमिनीच्या वादातून शेतकऱ्याचा लोखंडी सळईने खून करून मृतदेह चारीत टाकून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पारनेर तालुक्यातील बाबुर्डी येेथे ही घटना घडली. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा व सुपा पोलिसांच्या संयुक्त पथकाने दोन आरोपींना मध्यरात्रीच्या सुमारास अटक केली आहे. दोघांनीही खुनाची कबुली दिली आहे. राहुल बाळासाहेब दिवटे व तेजेस बाळासाहेब दिवटे (दोघे रा. बाबुर्डी, ता. पारनेर) ही अटक केलेल्यांची नावे आहेत. दत्तात्रय सुखदेव ठुबे (वय ५५) हे मयताचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी की, दि. १६ मार्च २०१९ रोजी सुपा पोलीस स्टेशन हद्दीत बाबुर्डी गावचे शिवारात शिवाजीनगर येथे दत्तात्रय सुखदेव ठुबे हे राहते घराजवळ शेतजमीनीलगत बांधाच्या चारीमध्ये जखमी अवस्थेत पडलेले आढळले. त्यानंतर वस्तीवर राहणाऱ्या लोकांनी त्यांना उपचारासाठी सुपा येथील निरामय हॉस्पीटल येथे आणले. मात्र, उपचारापुर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

सुपा पोलीस स्टेशनला आर्म रजि नं ०६/२०१९ सी आर पी सी १७४ प्रमाणे दाखल करण्यात आला होता. परंतु, मयताचे डोक्यावर व पाठीवर मारहाणीच्या खुणादिसत असल्याने सदर आर्मच्या तपासात पोलीस अधिक्षक ईशु सिंधू, अपर पोलीस अधिक्षक सागर पाटील,  सहाय्यक पोलीस अधिक्षक मनिष कलवानिया यांचे मागदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार, सुपा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी राजेंद्र भोसले, पोसई संजयकुमार सोने ,पोसई रोहन खंडागळे, पोलिस कर्मचारी तुकाराम काळे, शिवाजी कडुस, सुरेश धामणे,  अमोल धामणे, सुरेश मुसळे, स्थागुशा पोलीस कर्मचारीभागिनाथ पंचमुख, दिगंबर कारखेले, विजय धनेधर व चापोहेकॉ / संभाजी कोतरकर हे करीत असताना वैदयकीय अधिकारी ससून हॉस्पीटल यांनी सदर मयताचे मरणा बाबत दि १८/०३/२०१९ स्पष्ट मत दिल्याने लागलीच सुपा पोस्टे गुरनं । ७०/२०१९ भादंवि क ३०२,३४ प्रमाणे गुन्हा रजि दाखल करण्यात आला.

तपासात आरोपी राहुल बाळासाहेब दिवटे व तेजेस बाळासाहेब दिवटे यांना तात्काळ त्यांचे राहते घरी बाबुर्डी, ता.पारनेर येथुन ताब्यात घेऊन गुन्हयाबाबत विचारपुस केली. त्याने गुन्हयाची कबुली दिल्याने त्याला अटक करण्यात आली आहे.  पुढील तपास पोसई संजयकुमार सोने हे करीत आहेत.

You might also like