जमिनीच्या वादातून चुलत्याकडून पुतण्याचा खून

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – संगमनेर येथील जमीन विकल्याच्या रागातून चुलत्याने पुतण्याला टणक वस्तूने बेदम मारहाण केली. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या पुतण्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. संदीप रमेश ठोंबरे (वय ३५, रा. पिंपरणे, ता. संगमनेर) हे मयताचे नाव आहे. ही घटना काल पिंपरणे गावच्या शिवारात घराजवळील रस्त्यावर घडली.

संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात भाऊसाहेब लक्ष्मण ठोंबरे, लक्ष्मीबाई भाऊसाहेब ठोंबरे, (रा. पिंपरणे, ता संगमनेर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मयताची पत्नी दीपाली संदीप ठोंबरे यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, भाऊसाहेब ठोंबरे हा चुलत सासरा आहे. त्याच्याशी शेतजमिनीवरुन वाद आहे. माझ्या सास-याने त्यांच्या हिश्याच्या शेतजमिनीमधील २० गुंठे शेतजमीन विकल्याचा आरोपींना राग होता.

विकलेल्या २० गुंठे शेतजमिन घेतलेल्यांना हरकत अडथळा करून तुम्ही येथे यायचे नाही. तुम्ही येथे आले तर तुमचे तंगडे तोडू, अशी धमकी दिली. यावरुन आरोपींनी आम्हाला तुम्ही विकलेल्या शेतजमिनीत माझी जमीन आहे, असे म्हणत तुम्हाला एकेकाला संपवून टाकील, अशी धमकी देवून पती संदीप रमेश ठोंबरे यांना लाथाबुक्क्याने व काहीतरी वस्तूने बेदम मारहाण करुन जबर जखमी केले.

जखमी ठोंबरे यांना सुरुवातीला तांबे हॉस्पिटल व त्यानंतर लोणीच्या प्रवरा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना संदीप ठोंबरे यांचा मृत्यू झाला.

भरपावसात विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन

‘तारूण्य’ टिकवण्यासाठी हसत रहा, जाणून घ्या महत्वाचे फायदे

तुम्ही खात असलेले अन्न हे शरीर व मनासाठी आरोग्यवर्धक आहे का ?

विविध रंगाच्या बाटल्यांमधील पाणी सेवन करा, आरोग्य सुधारेल

सर्दीची ‘अ‍ॅलर्जी’ का होते ? जाणून घ्या यामागील कारणे

पोलिसाच्या घरातच चोरट्यांनी केला हात साफ