चारित्र्याच्या संशयावरून मानेवर कुर्‍हाडीने सपासप वार करून पत्नीचा खून

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – कोपरगाव तालुक्यातील वारी परिसरातील खोलवाट वस्ती येथे पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा पती अमोल मारुती बोर्डे याने पत्नी सविता अमोल बोर्डे (वय २७ ) हिचे डोके व मानेवर कुऱ्हाडीने सपासप वार करून खून केला. रविवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी काल रात्री उशिरा कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मयताचा भाऊ भानुदास मल्हारी मोरे (रा .रांजणगाव, ता. चाळीसगाव, जि.जळगाव ) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, गेल्या एक वर्षापासून माझे दाजी अमोल बोर्डे हे माझ्या बहिणीच्या चारित्र्यावर संशय घेत होते. माझी बहिण राहत असलेल्या गल्लीत शेजारच्या लोकांशी बोलताना आढळल्यास तू परपुरुषाशी कशाला बोलतेस तुझे त्यांच्याशी काहीतरी संबंध आहे, असे बोलत सतत मारहाण करीत होते. याच कारणावरून माझे दाजी व बहिण यांच्यात रविवारी दुपारी दीड ते दोन वाजेच्या सुमारास झालेल्या भांडणात दाजी अमोल यांनी माझी बहिण हिच्या उजव्या कानाच्यावर डोक्यात, मानेवर व डाव्या हाताच्या मनगटावर कुऱ्हाडीने घाव घातले होते. घटनेविषयी सविताचे भाये भास्कर मारुती बोर्डे यांना विचाले असता त्यांनी झालेल्या सर्व घटनेविषयी माहिती दिली. असे भानुदास मोरे यांनी म्हटले आहे.