पिंपरी : पत्नीच्या डोक्यात फरशी घालून खून

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – भोसरी, गुळवेवस्ती येथे घरगुती वादातुन पत्नीच्या डोक्यात फरशी घालून पतीने खून केल्याची घटना सोमवारी सायंकाळी साडे चारच्या सुमारास घडली. कावेरी विशाल काळे (25, रा. साजन बेकरी शेजारी, गुळवेवस्ती, भोसरी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर विशाल काळे याने खून केला आहे.

भोसरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कावेरी आणि विशाल हे दोघे संजय लांडे यांच्या खोलीत भाड्याने राहत होते. त्यांच्यात किरकोळ कारणावरून भांडण होत होते. सोमवारी दुपारी दोघांमध्ये वाद झाला यातून चिडून विशाल याने पत्नी कावेरी हिच्या डोक्यात फरशी घातली. रक्ताच्या थरोळ्यात पडलेल्या कावेरी हिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारपूर्वीच तिचा मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

विशाल हा गुन्हेगार असून त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. तपास भोसरी पोलिस करत आहेत.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा…आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध,अशी घ्या काळजी