धक्कादायक ! परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या विद्यार्थिनीचा गळा चिरून खून

बुलडाणा : पोलीसनामा ऑनलाइन – परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या २७ वर्षाच्या विद्यार्थिनीचा गळा चिरुन खून केल्याचे उघडकीस आले आहे. ही घटना खामगावातील संजीवनी कॉलनी परिसरात घडली. अश्विनी सुधीर निंबोकार असे या युवतीचे नाव आहे. एमएची परीक्षा सुरू असल्याने अश्विनी संजीवनी कॉलनीतील परीक्षा केंद्रावर गेली होती. परतत असतानाच तिची संजीवनी कॉलनीमागील निर्जनस्थळी हत्या झाली.

युवतीच्या हत्या प्रकरणाशी धागेदोरे जुळत असलेल्या आरोपीचे नाव सागर निंबोळे (रा. पातूर) असे आहे. हत्या केल्यानंतर त्याने शेगावकडे पळ काढला. पोलीस मागावर असल्याचे समजताच रेल्वेतून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याचे समजते.

सराफांचा एकमेकांवर अ‍ॅसिड हल्ला
तालुक्यातील टुनकी येथे दोन सराफा व्यावसायिकांमध्ये शनिवारी दुपारी ग्राहक वळविल्याच्या कारणावरून वाद झाला. वाद विकोपाला गेल्याने एकमेकांवर अ‍ॅॅसिड हल्ला करण्यात आला. यात चौघे गंभीरीत्या जखमी झाले.

संग्रामपूर तालुक्यातील टुनकी गावात समोरासमोर सराफा व्यवसाय करणारे संजय शिंगणापुरे, शुभम शिंगणापुरे आणि सुधीर पिंजरकर, राहुल पिंजरकर यांच्यात ग्राहक वळविल्याच्या कारणावरून शनिवारी दुपारी २ वाजता वाद झाला. या वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले.  भांडणादरम्यान एकमेकांच्या अंगावर अ‍ॅसिड फेकण्यात आले. यात संजय शिंगणापुरे यांचा हात भाजला  असून, चेहºयासह डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे, तर त्यांचा पुतण्या शुभम शिंगणापुरे याचाही हात व चेहरा भाजला. तसेच राहुल व सुधीर पिंजरकार हे दोघे भाऊही या दरम्यान जखमी झाले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like