बीड : धारुरच्या माजी नगराध्याक्षाच्या पतीचा दगडाने ठेचून निर्घृण खून, सर्वत्र खळबळ

धारूर : पोलीसनामा ऑनलाइन – धारुर शहराच्या माजी नगराध्यक्ष सविता शनगारे यांच्या पतीचा दगडाने ठेचून निर्घृण खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना आज (सोमवार) घडली आहे. या घटनेमुळे धारूर शहरामध्ये खळबळ उडाली आहे. त्यांचा खून कोणत्या कारणामुळे करण्यात आला हे अद्याप समजू शकले नसून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

नामदेव भिमराव शिनगारे (वय-५२) असे खून करण्यात आलेल्या माजी नगराध्यक्षांच्या पतीचे नाव आहे. नामदेव शिनगारे हे नगर पालिकेचे कर्मचारी असून त्यांचा आज दुपारी दगडाने ठेचून खून करण्यात आला.  केज धारूर रस्त्या वर धारूर शहरापासून दिड किमी अंतरावर शेतात आंब्याच्या झाडाखाली चेहरा रक्तबंबाळ झालेल्या अवस्थेत नामदेव शिनगारे यांचा मृतदेह आढळून आला.

नामदेव शिनगारे त्यांची दुचाकी गाडी घटनास्थळापासून अर्ध्या  किंमीवर पांदन रस्त्यावर उभी असल्याचे आढळले. ही घटना दुपारनंतर घडल्याचा अंदाज असून या खूनाच्या घटनेने शहरात मात्र खळबळ माजली आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांसह धारूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like