दारु पिण्याच्या वादातून खडकी बाजारमध्ये खुन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – लष्कर अधिकाऱ्यांच्या स्टाफसाठी दिलेल्या बंगल्यामध्ये दारू पिण्यावरुन झालेल्या वादातून एकाच्या डोक्यात दगड घालून व हत्याराने वार करुन त्याचा खुन करण्याची घटना मध्यरात्री घडली. याप्रकरणी खडकी पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

राजेश राजू स्वामी, सागर अशोक उंबरकर, धिरज गवळी, रेणुका परदेशी आणि राधा राजू स्वामी अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे असून पोलिसांनी दोन्ही महिलांना ताब्यात घेतले आहे. गोपाळ अर्जुन कांबळे (वय २९, रा. बंगला नंबर २३, खडकी बाजार, खडकी) असे खुन झालेल्याचे नाव आहे. ही घटना खडकी बाजारमधील बंगला नंबर २३ येथे मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास घडली.

हेही वाचा – पुण्यात छऱ्याच्या बंदुकीतून मित्रावर गोळीबार

याबाबत पोलिसांनी सांगितले की, लष्करी अधिकाऱ्यांच्या स्टाफसाठी असलेल्या बंगल्यात हे सर्वजण जमले होते. त्यांच्यात दारु पिण्यावरुन वाद झाला. त्यात या पाच जणांनी चिडून गोपाळ कांबळे याला मारहाण केली. त्याच्या डोक्यात दगड घातला व हत्याराने त्याच्यावर वार केले. गोपाळ याचा जागीच मृत्यु झाला. याची माहिती मिळाल्यावर खडकी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी तेथे दोन्ही महिला होत्या. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. अधिक तपास खडकी पोलीस करीत आहेत.