पुण्यातील कोरेगांव पार्क परिसरात कोयत्याने सपासप वार करून खून

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – पुण्यातील कोरेगांव पार्क परिसरात एका रिक्षा चालकाचा अज्ञातांनी मध्यरात्री भररस्त्यात कोयत्याने सपासप वारकरून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. अद्याप हल्लेखोरांचा थांगपत्ता लागलेला नाही.

राहुल विनायक जगताप (वय 47) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी कोरेगांव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राहुल हे रिक्षा चालक आहेत. ते राहण्यास कवडेवस्ती लेन नंबर 5 येथे होते. दरम्यान रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ते रिक्षा घेऊन लेन नंबर 5 मधून जात असताना अचानक आलेल्या हल्लेखोरानी त्यांना अडवून त्यांच्यावर कोयत्याने सपासप वार केले. तसेच हल्लेखोर पसार झाले. पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला याची माहिती मिळाल्यानंतर कोरेगाव पार्क पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत त्यांच्या नातेवाइकांनी त्यांना ससून रुग्णालयात नेले होते. डॉक्टरानी तपासण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. कोरेगाव पार्क पोलिसांनी चौकशी सुरू केली असून, त्यांचे कोणाशी वाद होते याबाबत माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. तसेच परिसरात असणाऱ्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपींचा माग काढण्यात येत आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like