कारचा हॉर्न वाजवल्याचा राग आल्याने 30 वर्षीय युवकाचा लासलगाव मध्ये खून

लासलगाव :  येथील इंदिरानगर भागात दिनांक 16 जून रात्री रात्री साडेदहा वाजेच्या साहिल शेख हे भर रस्त्यात वाढदिवस साजरा करत होते. दरम्यान कारचा हॉर्न वाजवल्या चा राग येत टोळक्याने चेतन बाळु बैरागी वय ३० वर्षीय युवकाचा खून केल्याची घटना घडली.या प्रकरणी सहा आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की आकाश शेजवळ आणि चेतन बाळू बैरागी इंटींगा कार ही चालवून घेवून जात असताना तेथे साहिल इमरान शेख हे भर रस्त्यात आपला वाढदिवस साजरा करीत होते. त्यावेळी त्याठिकाणी गर्दी असल्याने फिर्यादी आकाश यांनी कारचा हॉर्न वाजविला. त्यांचा आरोपीना राग येवून त्यांनी फिर्यादी यांची गाडी थांबवून त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून आरोपी साहिल इम्रान शेख याने त्याचे हातातील चाकूसारख्या धारदार शस्त्राने फि्यादीचे आकाश शेजवळ च्या कमरेस डावे बाजूस व मांडीवर वार करून जीवेठार मारणेचा प्रयत्न केला. त्यावेळी यातील चेतन बैरागी हे फिर्यादीचे मदतीसाठी फिर्यादी यांचेकडे येत असताना बरील सर्व आरोपी साहील इमरान शेख, फिरोज अकबर शहा, इम्रान सलीम सैय्यद, कृष्णा वर्षे पुर्ण नांव माहित नाही,रोहित शिरसाठ, अरुण माळी,राजू राजूळे पुर्ण नांव माहित नाही, काळु लहाने, दत्तु जाधव इतर दोन ते तीन यांनी जबर मारहाण केली साहिल शेख याने त्याचे ताब्यातील चाकूसारख्या धारदार शस्त्राने चेतन बैरागी पोटात मारून दुखापती करून जीवे ठार मारले

जिल्हादंडाधिकारी नाशिक यांनी कोराना आजारावर प्रतिबंध होणेसाठी लॉकडाऊन आदेश पारीत केलेले असताना त्या आदेशाची अवज्ञा केल्याने लासलगाव पोलीस ठाण्यात गुरनं व कलम- २९३/२०२० भादवि ३०२, ३०७, ३२३, १४३, १४७, १४९, १८८, २६९, २७०, आर्म अंक्ट कलम ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे

या प्रकरणी माधव रेडडी, उपविभागीय पोलीस अधिकारी निफाड, के.टी. रंजवे, सहा. पोलीस निरीक्षक, लासलगाव पोलीस ठाणे यांनी घटना स्थळी भेट दिली असून ६ आरोपीना ताब्यात घेतले आहे