Murder in Mumbai | … म्हणून मुंबईत बोलावून तरुणाची केली निर्घृण हत्या, चौघांना अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन (policenama online) – पत्नीसोबत अनैतिक संबंध (Immorality) असल्याच्या कारणावरून एकाला बिहारहून मुंबईत बोलावून त्याची निर्घृण हत्या (Murder in Mumbai) केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) गुन्हे शाखेने (Crime Branch,) चौघांना अटक केली आहे. Murder in Mumbai | bihar man killed out of extra marital affair in mumbai by girlfriends husband

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

राजेश चौपाल असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी सुरेंद्र मंडल, शंभू आणि रामकुमार, मुकादम विजय मिस्त्री आदींना अटक केली आहे.

प्राप्त माहितीनुसार, बिहारहून मुंबईत आलेल्या सुरेंद्र मंडलला आपल्या पत्नीचे आपल्याच गावात राहणाऱ्या राजेश चौपाल या तरुणाशी प्रेमसंबंध असल्याची कुणकुण लागली होती. त्यामुळे त्याने मुंबईत सोबत काम करणा-या मित्रासमवेत कट रचून राजेशची हत्या केली. सुरेंद्र बोलाल्याने राजेश 14 जून रोजी बिहारहून मुंबईला निघाला होता. ट्रेन कुर्ला स्थानकात (Kurla station) पोहोचली. मात्र राजेश मुंबईतील घरी न पोहचल्याने त्याच्या वडिलांनी ओशिवरा पोलीस ठाण्यात (Oshiwara Police Station) तो हरवल्याची तक्रार दिली. त्यानुसार गुन्हे शाखा 5 चे प्रभारी निरीक्षक घनशाम नायर यांनी तपासाची चक्रे फिरवली.

आरोपीनी राजेशला कुर्ल्याहून सीएसएमटी येथे बोलावल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी हाच धागा पकडून आणि तांत्रिक अभ्यास सुरु केला.
कुर्ला स्थानकात उतरून राजेश टॅक्सीने सीएसएमटीला गेला.
त्याठिकाणी आरोपींनी त्याचे अपहरण करून त्याच परिसरातील एका बांधकामाच्या साईटवर नेऊन हत्या केली.
त्यानंतर राजेशचा मृतदेह पाण्याच्या टाकीत टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
खून करून आरोपी राज्याबाहेर पळाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी 2 पथके तयार करून एक बिहार तर दुसरे कर्नाटकात पाठवले होते.
त्यानुसार बिहारमधून सुरेंद्र, शंभू आणि रामकुमार तर कर्नाटकातून त्यांचा मुकादम विजय मिस्त्रीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

Web Title :- Murder in Mumbai | bihar man killed out of extra marital affair in mumbai by girlfriends husband

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

तुमच्या Aadhaar Card वर जेंडर चुकीचे आहे का? UIDAI ने जारी केली लिंक; आता घरबसल्या अपडेट करा ‘या’ सोप्या पध्दतीनं, जाणून घ्या

Kissing Benefits | किस करण्याचे 7 आरोग्यदायी आणि आनंददायी फायदे ! जाणून घ्या

Kolhapur News | 2 हजाराची लाच घेताना दुय्यम निबंधक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात