कडेगाव : नेवरी येथे प्रेमप्रकरणातून एकाच खून

कडेगाव : शहर प्रतिनिधी – प्रेमप्रकरणातून तरुणाचा खून केल्याची घटना कडेगाव तालुक्यातील नेवरी येथील उरण कांचन परिसरात शुक्रवारी रात्री ९ च्या सुमारास घडली.

प्रदीप भिकाजी शिंदे असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

तर संशयित आरोपी राजेंद्र मधुकर कारंडे याच्यावर कडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

प्रदीप भिकाजी शिंदे याच्या चुलत बहिणीसोबत संशयित राजेंद्र शिंदे याचे प्रेमसंबंध होते. त्यामुळे प्रदिप याने राजेंद्रला यासाठी समज देण्यासाठी बोलावले होते. त्यावेळी राजेंद्र याने लपवून आणलेल्या चाकूने प्रदीपचा खून केला.