नेवासा : किरकोळ वादातून एकाची हत्या

नेवासा ( जि. नगर): पोलीसनामा ऑनलाइन – तालुक्यातील बालाजी देडगाव येथे किरकोळ वादातून काल रात्री डोक्यात दांड्याने वार करून एकाची हत्या करण्यात आली. यामध्ये शेषराव पांडुरंग मोरे(वय ५० रा.देडगाव) हे मयत झाले आहे. घटनेने बालाजी देडगाव परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की बालाजी देडगाव येथील शेषराव पाडुरंग मोरे व संभाजी उर्फ बाळू शिवाजी थोरात हे रात्री दारू पिल्यानंतर त्यांच्यात वाद झाले त्यानंतर थोरात याने मोरे यांच्या डोक्यावर दांड्याने वार केले सदर घटना देडगाव-तेलकुडगाव रस्त्यावर घडली. दरम्यान मोरे याचा मृतदेह मोसंबी बागेत आढळला आहे.

या घटनेची माहिती नेवासा पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन रीतसर पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपासणीसाठी नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे. दरम्यान संभाजी थोरात याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Visit : Policenama.com 

Loading...
You might also like