निगडीत धारदार शस्त्राने सपासप वार करुन एकाचा खुन

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – घरात एकटा राहणाऱ्या एकाच्या डोक्यात वार करुन खुन करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. येशु मुरगन दास (वय ४५, रा. गुरुदेवनगर, चव्हाण चाळ, आकुर्डी) असे खुन झालेल्याचे नाव आहे. ही घटना चव्हाण चाळीत २८ ऑक्टोबरला सायंकाळी ५ ते २९ ऑक्टोबरला दुपारी साडेबारा वाजण्याच्या दरम्यान घडली.

याप्रकरणी येशु याची पत्नी उर्सुला दास (वय ३९, रा. आंबेडकरनगर, देहुरोड) यांनी निगडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, येशू दास हा मोलमजुरी करीत असे. त्याचे आणि पत्नीचे भांडण झाल्याने ती माहेरी रहात असे. येशु एकटाच चव्हाण चाळीत भाड्याच्या घरात रहात होता. उर्सुला दास या काल दुपारी पोलीस ठाण्यात आल्या व त्यांनी आपल्या पतीला कोणीतरी मारल्याचे सांगितले. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असताना येशु दास याच्या डोक्यात व इतर ठिकाणी धारदार हत्याराने वार करुन खुन केल्याचे दिसून येत होते. आपल्याला ही घटना घरमालकाने सांगितल्याचा येशुची पत्नी उर्सुला दास हिने पोलिसांना सांगितले आहे.

Visit : Policenama.com