मनोरुग्ण मुलाकडून वृद्ध आईचा खून

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – मनोरुग्ण असणाऱ्या चाळीस वर्षीय मुलाने ६० वर्षीय आईचा घरातील कात्रीने वार करुन खून केल्याची घटना रविवारी दुपारी चारच्या सुमारास उघडकीस आली. चिंचवड पोलीस घटनास्थळी पोहचले असून तपास सुरु आहे.
सुमन सावंत (६०, आठवण हॉटेलमध्ये पाठीमागे गुरुद्वारा रोड, चिंचवड) असे खून झालेल्या आईचे नाव आहे. तर मुलगा मनोरुग्ण भुपेंद्र (४०) याच्यावर संशय आहे. हा प्रकार रविवारी सकाळी राहते घरात झालेला असून दुपारी चारच्या सुमारास उघडकीस आली आहे.

आईचा खून का केला याचा तपास अद्याप लागलेला नाही. चिंचवड पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. मृतदेह रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठवला आहे. पोलीस शोध घेत आहेत.