धक्कादायक ! पिंपरीत फक्त बिलाच्या वादातून तरुणचे अपहरण करुन गळा चिरून खून

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन – कासारवाड़ी येथील शितल हॉटेल मध्ये सुरु असलेल्या बिलाच्या वादावरून भांडण सोडविण्यास गेलेल्या तरुणाचे अपहरण करुन, डोक्यात कोयत्याने वार करुन, गळा चिरून खून करण्यात आला. ही घटना सोमवारी मध्यरात्री तिनच्या सुमारास पिंपरी महानगरपालिका इमरतीच्या मागील बाजूला वरदहस्त सोसायटी समोरील रस्त्यावर घडली.

हितेश मूलचंदानी (23, रा. बी ब्लॉक, पिंपरी) याचा खून झाला आहे. तर चौघांवर संशय आहे. पिंपरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हितेश हा पिंपरी परिसरात मित्रांसोबत बसला होता. दरम्यान त्याच्या मित्राचा कासारवाडी येथील शितल हॉटेल मध्ये बिल देण्यावरून वादावाद सुरु असल्याचा त्याला फोन आला. त्यामुळे तो त्याच्या इतर मित्रांसोबत शितल हॉटेल येथे गेला. याठिकाणी हॉटेल मलकांनी एकाला पकडून ठेवले. त्यावेळी बिल न देणाऱ्यांनी त्यांच्या इतर साथीदाराना बोलवले.

यातील चौघांनी हितेशला जबरदस्तीने गाडीत बसवले. पिंपरी महानगरपालिका इमरतीच्या मागील बाजूला वरदहस्त सोसायटी समोरील रस्त्यावर आणले. तेथे त्याच्या डोक्यात कोयत्याने वार केले आणि गळा कापला. रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणावर झाल्याने त्याचा मृत्यू झाला. खून करणारे सराइत गुन्हेगार असून पोलिस त्यांच्या शोध घेत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –