पिंपरीत पत्नीचा गळा आवळून खून

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पत्नीने दारू पिण्यास पैसे दिले नाहीत म्हणून आणि ती आवडत नसल्याच्या कारणावरुन पतीने पत्नीचा गळा आवळून खून केला. तर पुरावा नष्ट करण्यासाठी पतीने मृतदेह डोंगरात फेकून दिला. हा प्रकार हवलदार वस्ती, मोशी येथे गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास घडला.

पिंकी संतोष सप्रे (27, रा. मोशी, मूळ- बाकी, छत्तीसगड) हीचा खून झाला आहे. तर संतोष नेमुराम सप्रे (32, रा. बाकी, छत्तीसगड) याला अटक केली आहे. पोलिस उपनिरीक्षक रुपाली पाटील यांनी फिर्याद दिली आहे.

एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष याला दारुचे व्यसन आहे. त्याने पत्नी पिंकी हिच्याकडे दारूसाठी पैसे मागितले, मात्र पिंकिने पैसे देण्यास नकार दिला. यावरून चिडून त्याने तिला डोंगरात नेले, तेथे तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने तिचा मृतदेह डोंगरात फेकून दिला. तपास एमआयडीसी भोसरी पोलिस करत आहेत.

Visit : Policenama.com