तरुणाचा खून, पुरावा नस्ट करण्यासाठी मृतदेह टाकला नदीपात्रात

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – एका २५ ते ३० वयोगटातील तरुणाच्या डोक्यात, शरीरावर वार करुन खून करण्यात आला. त्यानंतर पुरावा नस्ट करण्याच्या हेतूने मृतदेह नदीपात्रात टाकण्यात आला. या तरुणाचा मृतदेह नदीपात्रात आढळल्याने पोलिसांनी तो बाहेर काढून तपास सुरु केला आहे. हा मृतदेह पवना नदीपात्रात गहूंजे गावच्या हद्दीत सोमवारी सायंकाळी आढळला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पवना नदीपात्रात गहूंजे गावच्या हद्दीत एक मृतदेह असल्याची माहिती मिळाली. तत्काळ पोलीस घटनास्थळी पोहचले. मृतदेह बाहेर काढून यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात हलविण्यात आला. पोलिसांनी पाहणी केली असता तरुणाच्या डोक्यात हत्याराने वार केल्याच्या जखमा आहेत. तसेच शरीरावरही जखम आहेत. कंबरेला दोरी बांधलेली होती. त्यामुळे त्या तरुणाचा खून करुन, पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह पाण्यात टाकल्याचे स्पष्ट झाले. तरुणाची ओळख पटली नसून हातावर ओम गोंदले आहे. तळेगाव दाभाडे पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

You might also like