धक्कादायक ! दुसऱ्याशी ‘झेंगाट’ असल्याच्या संशयावरून सॉफ्टवेअर इंजिनिअरने केला प्रेयसीचा खुन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – आपली प्रेयसी दुसऱ्या मुलावर प्रेम करीत असल्याच्या संशयावरुन हिंजवडीत काम करीत असलेल्या एका सॉफ्टवेअर इंजिनिअरने चाकूने सपासप वार करुन प्रेयसीचा खुन केल्याची घटना मंगळवारी रात्री दहा वाजता चंदननगर येथे घडली.

मीना पटले (वय २३, रा. चंदननगर) असे मृत्यु पावलेल्या तरुणीचे नाव आहे. चंदननगर पोलिसांनी किरण अशोक शिंदे (वय २५, रा. काळेवाडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण शिंदे हा काळेवाडी येथे राहत असून तो पिपंरी येथील एका कॉलेजमध्ये इंजिनिअरींगच्या शेवटच्या वर्षाला आहे. शिकत असतानाच तो हिंजवडी येथील एका कंपनीत काम करीत आहे.

मीना पटले ही मुळची गोंदिया येथील राहणारी असून सुरुवातीला तीही काळेवाडी येथे रहात होती. त्यातून किरण शिंदे याच्याबरोबर तिची ओळख झाली होती. तिने नर्सिंगचा कोर्स केला आहे. तिचाही नर्सिगचा कोर्स पूर्ण झाला नव्हता. सध्या ती वल्लभनगर येथील एका कॉलसेंटरमध्ये बॅक आफिसमध्ये काम करत होती. गेल्या एक वर्षांपासून त्यांच्यात प्रेमसंबंध होते. पण गेल्या सहा महिन्यांपासून मीना हिचे दुसऱ्याबरोबर प्रेमसंबंध असल्याचा किरणला संशय होता. त्यातून त्यांच्यात भांडणे झाली. त्यामुळे गेल्या ३ महिन्यांपासून ते एकमेकांशी बोलत नव्हते.

मीना त्याच्याशी बोलत नसल्याने किरण खूप अस्वस्थ होता. तो गेल्या दोन दिवसांपासून घरीही गेला नव्हता. मीना सध्या चंदननगर येथे रहायला आली होती. किरण याने तिला मंगळवारी रात्री चंदननगरमधील टाटा गार्ड रुम जवळ बोलावून घेतले. तेथे त्यांच्यात पुन्हा वाद झाल्यावर त्याने तिच्यावर चाकूने सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मीनाला पाहून किरण पळून गेला. जखमी अवस्थेत मीना हिला कोकडे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. उपचार सुरु असताना रात्री अकरा वाजता तिचा मृत्यु झाला.

किरण याने आपला मोबाईल बंद ठेवला असून चंदननगर पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
याप्रकरणी किरण शिंदे याचा मित्र प्रकाश बापू गप्पाट याने फिर्याद दिली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

पाहिल्या पाऊसाचा आनंद घ्या मनसोक्त, बिनधास्त भिजा

स्मार्टफोनच्या अतिवापराने तुम्हालाही होऊ शकतो ‘नोमोफोबिया’!

पुण्यातील डॉक्टर झटतेय काश्मीरमधील नागरिकांच्या आरोग्यासाठी

ई-फार्मसीसाठी ई-प्रिस्क्रिप्शनची गरज

Loading...
You might also like