अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने काढला ‘काटा’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या सुरक्षारक्षक असलेल्या पतीचा पत्नीने प्रियकराच्या मदतीने काटा काढल्याचा धक्कादायक प्रकार फुरसुंगीमध्ये उघडकीस आला आहे.
प्रकाश शंकर विलायतकर (वय ४५, रा. कानिफनाथनगर, फुरसुंगी) असे या सुरक्षारक्षकाचे नाव आहे. हडपसर पोलिसांनी या प्रकरणी पत्नीसह तिघांना मध्यरात्री ताब्यात घेतले आहे. प्रियकराचा शोध घेतला जात आहे.

फुरसुंगी येथील कानिफनाथनगर येथील मुळा मुठा कॅनॉलच्या शेजारी असलेल्या मातीच्या भरावावर एका व्यक्तीचा खुन झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मात्र, त्याची ओळख पटत नव्हती. त्याच्या हातावर व शरीरावर मारहाणीच्या ताज्या जखमा दिसत होत्या. त्याच्या अंगावरील कपड्यांवरून तो सुरक्षारक्षक असावा असे दिसत होते. त्यावरुन पोलिसांनी माहिती काढल्यावर तो मृतदेह प्रकाश विलायतकर याचा असल्याचे गुरुवारी रात्री स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याच्या पत्नीनेच प्रियकर व इतरांच्या मदतीने पतीचा काटा काढल्याचे निष्पन्न झाले आहे.

प्रकाश विलायतकर हा बुधवारी रात्री दारु पिलेला होता. आरोपीही दारू पिले होते. त्यावेळी त्यांच्यात वाद झाले. तेव्हा प्रियकर व त्याच्या साथीदारांनी प्रकाश याला बाबुंने बेदम मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यु झाला. त्यानंतर त्यांनी कॅनॉलच्या भरावावर त्याचा मृतदेह टाकून पळून गेले. हडपसर पोलीस प्रियकरासह अन्य साथीदारांचा शोध घेत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

ह्रदयाची घ्या अशी काळजी , कधीही होणार नाहीत ब्लॉकेजेस …! 

आजपासून योगा करण्याचा संकल्प करणार असाल तर ‘या’ आसनांपासून करा सुरुवात 

मधुमेह, मानसिक आजार आणि हृद्यरोगाला दूर ठेवण्यासाठी करा हे “प्राणायम” 

गर्भधारने दरम्यान महिलांनी घ्या व्यायामाची अशी ” काळजी ”