पुणे जिल्ह्यात सराईत गुन्हेगाराचा दगडाने ठेचून खून

पुणे (शिरुर) : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे जिल्ह्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगाराचा दगडाने ठेचून खून करून मृतदेह नदीपात्रात फेकून दिल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून हा खून कोणी केला हे अद्याप समजू शकले नाही. आर्थिक वादातून खून झाला असल्याची शक्यता शिक्रापूर पोलिसांनी वर्तवली आहे.

रुपेश जगतराव वाल्हे असे खून झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. रुपेश याचा शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथे दगडाने ठेचून खून करण्यात आला. रुपेश याचा मृतेदह नदीपात्रात आज सकाळी आढळून आला. घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रुपेश याच्यावर पुणे जिल्ह्यामध्ये अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली आहे.

रुपेश याचा खून वैयक्तिक वादातून झाला आहे का याचा तपास पोलीस करीत आहेत. त्याचा खून आर्थिक वादातून आणि गुन्हेगारांच्या वर्चस्वाच्या वादातून झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी शिक्रापूर पोलीस ठाण्याचे एक पथक तयार करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

आरोग्यविषयक वृत्त –