धक्‍कादायक ! कर्ज फेडण्यासाठी महिला फेसबुक फ्रेंडचा खून ; आरोपी पुणे पोलिसांच्या जाळ्यात

मुंढवा : पोलीनामा ऑनलाइन – फेसबुकवरील मैत्री एका महिलेच्या जीवावर बेतली आहे. कर्जाचे पैसे फेडण्यासाठी महिलेला एका निर्जन स्थळी नेऊन तिच्या अंगावरील दागिने काढून घेत तिचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून मृत महिला २२ जून २०१९ पासून बेपत्ता होती. आनंद शिवाजी निकम (रा. तापकीर नगर, काळेवाडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

मृत महिला मागील महिन्यापासून बेपत्ता होती. याप्रकरणी तिच्या मुलाने मुंढवा पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दिली. पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करत असताना त्यांना महिलेच्या फेसबुक फ्रेंडमधील आनंद निकम याच्यावर संशय आला. पोलिसांनी त्याचा शोध घेतला मात्र, त्याने घर बदलल्याचे तपासात समोर आले. पोलिसांनी त्याच्या नातेवाईक, मित्रांकडे चौकशी केली मात्र तो कोणाला काहीही न सांगता निघून गेल्याचे समोर आले. तसेच महिलेचा मोबाईल आरोपीच्या गाडीत सापडल्याने पोलिसांचा संशय अधिकच वाढला. पोलिसांनी त्याचा शोध घेऊन गुन्ह्यात अटक केली.

असा रचला कट

आरोपी आनंद आणि महिलेची ओळख फेसबुकवर झाली. त्यांनंतर त्यांच्यामध्ये भेटी होऊ लागल्या. आनंदवर कर्ज असल्याने त्याला पैशांची गरज होती. आरोपीने महिलेला ताम्हीणी घाटात फोटोग्राफी करू असे सांगून २२ जून रोजी तिला दागिने घालून येण्यास सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवून महिला दागिने घालून आली. त्यानंतर त्याने महिलेला ताम्हीणी गाव येथील निर्जन स्थळी घेऊन गेला. या ठिकाणी महिलेचे हात पाय बांधून तिच्यावर चायनीज चाकूने सपासप वार केले. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला. महिलेचा मृत्यू झाल्यानंतर आरोपीने तिच्या अंगावरील दागिने काढून पसार झाला.

कुजलेला मृतदेह आढळला

पोलिसांनी त्याने ज्या ठिकाणी महिलेचा खून केला त्या ठिकाणी घेऊन गेले. घटनास्थळी महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह पोलिसांना आढळून आला. तसेच हा मृतदेह बेपत्ता असलेल्या महिलेचाच असल्याचे समोर आले. पोलिसांनी आरोपीवर खूनाचा आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून अटक केली.

ही कारवाई पूर्व प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त सुनिल फुलारी, परिमंडळ ५ चे पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहायक पोलीस आयुक्त सुनिल देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपतराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक अमोल गवळी, स्वप्नील पाटील, सोनवणे, पोलीस हवालदार चव्हाण, गायकवाड, जगताप, चव्हाण, जाधव, काकडे, शिंदे, कांबळे, देशमुख यांच्या पथकाने केली.

स्तनाच्या कर्करोगाची ‘ही’ ६ लक्षणं, जाणवल्यास ‘हे’ ४ उपाय तात्काळ करा, जाणून घ्या

वजन कमी करण्याचे ‘हे’ १५ रामबाण उपाय, घाम देखील येणार नाही

गुलाबाच्या फुलाचे अशाप्रकारे सेवन ‘या’ आजारांसाठी उपयुक्‍त, जाणून घ्या

‘हे’ उपाय केल्यास ‘गॅस्ट्रिक ट्रबल’मध्ये त्वरित मिळेल आराम, औषध घेण्याची गरज नाही

दात मजबुत आणि पांढरे शुभ्र राहण्यासाठी ‘या’ ८ पदार्थांचं सेवन नक्‍की टाळा

पांढरे केस पुन्हा काळे करायचे आहेत मग ‘या’ १३ पैकी कोणताही एक उपाय कराच

विज्ञान आणि आयुर्वेद सांगतं ‘या’ पदार्थाने करा जेवणाची सुरूवात, ‘हे’ फायदे होतात