Murder in Pune | बहिणीसोबत केलेल्या कृत्याचा घेतला बदला, पुणे जिल्ह्याला हादरवणाऱ्या घटनेचा पर्दाफाश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन पुणे जिल्ह्यातील (Murder in Pune) चाकण येथील पीडब्ल्यूडी मैदानावर एका अल्पवयीन तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. हा प्रकार सोमवारी दुपारी उघडकीस आला होता. या घटनेमुळे चाकण परिसरात एकच खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Chakan Police) घटनास्थळी धाव घेत तपासाची चक्रे फिरवली. पोलिसांनी केलेल्या तपासात या खूनाचे (Murder in Pune) गुढ उकललं आहे. याप्रकरणी पोलिसांनी 7 जणांविरोधात गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

आरोपींनी बहिणीची छेड काढल्याच्या रागातून तरुणाचा फिल्मी स्टाइल खून (Film style murder) केल्याचे तपासात समोर आले आहे.
मयत 16 वर्षाच्या तरुणाने आरोपी अराफत शिकीलकर याच्या बहिणीची छेड काढली होती.
याचा राग मनात धरुन आरोपींनी मयत तरुणाच्या डोक्यात लोखंडी रॉडनं वार करुन निर्घृण खून केला. पोलिसांनी मुख्य आरोपी अराफत शिकीलकर याच्यासह युसुफ काकर, करण पाबळे, निहाल इनामदार,
हुजेब काकर, सोहेल इनामदार आणि मन्सूर इनामदार अशा सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

असा केला खून

आरोपी मन्सूरनं मृत मुलाचं आपल्या दुचाकीवरुन अपहरण (Kidnapping) केलं होतं.
त्यानंतर आरोपी मन्सूर याने त्याला चाकण येथील मार्केट यार्डसमोर (Market Yards) असलेल्या मोकळ्या मैदानात आणलं. याठिकाणी अराफत आणि त्याचे इतर पाच साथिदार आगोदरच आले होते.
तरुणाला या ठिकणी आणल्यानंतर सर्वांनी मिळून त्याला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.
आरोपी अराफत एवढ्यावर थांबला नाही तर त्याने हातातील लोखंडी रॉडने तरुणाच्या डोक्यात जबरी प्रहार केला.
तर आरोपी युसूफ काकर याने दगडानं तरुणाचं डोकं ठेचलं. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरुन पळून गेले.

 

रागातून तरुणाला संपवलं

केवळ बहिणीची छेड काढली या रागातून आरोपींनी तरुणाचा जीव घेतला. सोमवारी दुपारी एकच्या सुमारास एका स्थानिक नागरिकाला हा मृतदेह दिसल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करुन आरोपींचा शोध सुरु केला.
या प्रकरणी पोलिसांनी आरोपी युसूफ काकरला अटक (Arrest) केली आहे.
इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

 

Web Title : Murder in Pune | brother butal murder a young man who tease his sister murder in chakan pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Uday Samant | राज्यातील महाविद्यालये ‘या’ तारखेपासुन सुरु होणार – उदय सामंत यांची घोषणा

Rain in Maharashtra | राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता; पुण्यासह ‘या’ 18 जिल्ह्यांना हाय अलर्ट

Pravin Gaikwad | ‘मराठा ही बिझनेस कम्युनिटी व्हावी’, प्रवीण गायकवाड यांचे प्रतिपादन