दहीहंडीच्या वादातून तरुणावर तलवारीने सपासप वार करणारे ‘त्रिकुट’ अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – दहिहंडीच्या उत्सवादरम्यान झालेल्या किरकोळ वादातून एका तरुणावर ३ जणांनी कोयता आणि तलवारीने सपासप वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता. या गुन्ह्यातील तीन आरोपींना गुन्हे शाखा युनिट ४ च्या पथकाने पाषाण येथून अटक केली. हा प्रकार शनिवारी (दि.२४) रात्री हॉटेल सर्जा येथे घडला होती.

श्रवण जाधव असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्याने चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा युनिट ४ करत असताना आरोपी पाषाण रोड येथील सेंट सोसेफ स्कूलसमोर उभारले असून ते पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलीस कर्मचारी विशाल शिर्के आणि शंकर संपते यांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून विनायक सुनिल गायकवाड (वय-२५ रा. ढोरे कॉलनी, पाषाण गांव), किशोर लक्ष्मण रामावत (वय-२४ रा. संजय गांधी वसाहत, पाषाण), संकेत राजू जाधव (वय-२० रा. गणेशखिंड रोड, औंध) यांना अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी आणि त्यांचा मित्र दहीहंडीचा कार्यक्रम पहायला गेले होते. त्यावेळी फिर्यादी यांच्या मित्राचा धक्का गुन्हेगार संकेत जाधव याला लागला. याच कारणावरून त्यांच्यात वाद झाले होते. हे वाद फिर्यादी यांनी मिटवले होते. त्यावेळी आरोपींनी जिवे मारण्याची धमकी दिली होती. कार्यक्रमावरुन घरी परतत असताना आरोपींनी फिर्यादी जाधव यांच्यावर कोयत्याने आणि तलवारीने वार केले. अटक करण्यात आलेल्या आरोपी पैकी विनायक गायकवाड हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याला यापूर्वी तडीपार करण्यात आले होते.

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त बच्चन सिंह, पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक विजय झंजाड, निलेशकुमार महाडिक, पोलीस कर्मचारी सुनिल पवार, सचिन ढवळे, विशाल शिर्के, शंकर संपते, गणेश काळे, शंकर पाटील, शितल शिंदे यांच्या पथकाने केली.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like