Murder in Pune | पुण्यात कोयत्याने सपासप वार करुन चिकन दुकानदाराचा खून; बोपोडी परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील (Murder in Pune) बोपोडीत (Bopodi) एका चिकन दुकानदाराचा (Chicken shopkeeper) कोयत्याने सपासप वार करुन खून केल्याची घटना समोर आली आहे. आरोपी आणि दुकानदार यांच्यात पैशावरुन वाद होते. पैशाच्या वादातूनच आरोपींनी वार करुन खून (Murder in Pune) केला आहे.

मॉन्टी परदेशी (वय-26 रा. खडकी) असे खून झालेल्या चिकन दुकानदाराचे नाव आहे. याप्रकरणी खडकी पोलिसांनी (Khadki police) चार संशयितांना ताब्यात घेतले आहे. खडकी पोलिसांकडून त्यांच्याकडे चौकशी सुरु केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार. मॉन्टिचे बोपोडीत चिकन दुकान आहे.
आरोपी आणि मयत मॉन्टी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. त्यांच्यामध्ये पैशावरून वाद होते.
यावरुन आरोपींनी बोपोडी भागात मेट्रोचे काम (Metro work) सुरु असलेल्या एका ठिकाणी कोयत्याने व फरशीने डोक्यात वार केले.
यामध्ये गंभीर जखमी होऊन मॉन्टीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना दुपारच्या सुमारास घडली.
घटनेची माहिती मिळताच खडकी पोलीस ठाण्यातील (Khadki police station) अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
तसेच गुन्हे शाखेचे (crime branch) पथक दाखल झाले आहे.

Web Titel :- Murder in Pune | Murder of a chicken shopkeeper in Pune with a scythe; Incidents in Bopodi area

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

SBI नं पेन्शनधारकांसाठी केलं ‘हे’ मोठं काम, पेन्शनसंबंधीत सर्व सर्व्हिस होणार सोप्या, जाणून घ्या

CNG-PNG Prices | सर्वसामान्यांना पुन्हा बसणार झटका ! पुढील महिन्यात 10-11 % वाढू शकतात CNG चे दर

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या 294 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी