Murder in Pune | धक्कादायक ! पुण्यात वडिलांच्या आजारपणाला कंटाळला मुलगा, पठ्ठ्यानं ब्लेडनं बापाचा गळाच चिरला; पोलिसांनी मुसक्याच आवळल्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – वडिलांच्या आजारपणाला कंटाळून मुलाने त्यांचा ब्लेडने गळा चिरून खून (Murder) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बहिणीला व आईला कोणाला काही सांगू नये म्हणून त्याने दम दिला होता. दोन दिवसांपूर्वी हा खून (Murder) झाला होता. मात्र मुलाने वडिलांचा मृतदेह घरीच ठेवत बहिणीला कोणाला काही न सांगण्यास धमकावले होते. रहीम गुलाब शेख (वय 68) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी मुलगा नईम रहीम शेख (वय 35) याला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत पुण्याच्या (Pune) लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Lonikalbhor Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. पुण्यात अशा प्रकारे खून (Murder in Pune) झाल्यानं प्रचंड खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रहीम उरुळी कांचन येथील कदमवस्तीत रहावयास होते. दरम्यान, रहीम हे गेल्या महिन्यापासून आजारी होते. ते एकाठिकाणी झोपून होते. तर मुलगा नईम हा दारू पितो. तो मेकॅनिक असून, तो त्याचे घरीच काम करत असे. त्यांच्यासोबत रहीम यांची मुलगी आणि आरोपी याची बहीण व तिचे दोन मुलं राहत होते. रहीम यांची पत्नी ही वेगळी राहते.

कोरोना टेस्ट (Corona Test) आली होती निगेटिव्ह तरीही…

दरम्यान, त्याने वडील आजारी असल्याने त्यांची कोरोना चाचणी केली होती.
ती निगेटिव्ह आली होती.
मात्र त्यांच्या आजाराला कंटाळून त्याने दोन दिवसापूर्वी रात्री (दि. 8) वडिलांचा ब्लेडने गळा चिरून त्यांचा खून केला.
हा प्रकार बहीण व त्यांच्या मुलांना समजला.
पण त्यांना आरोपीने कोणाला काही सांगितले तर बघा असे म्हणून दम दिला होता.
त्यामुळे ते घाबरून होते.
खुनानंतर तो घराबाहेर गेलाच नाही.
यादरम्यान आज दुपारी तो बाहेर गेला.
यानंतर तात्काळ बहिणीने आईला हा प्रकार सांगत बोलावले आणि त्यांनी लोणी काळभोर पोलीस ठाणे गाठले.

पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली.
त्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. त्यांनी मुलाला लागलीच अटक केली आहे.
या घटनेमुळे लोणीकाळभोर परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्याकडे पुढील तपास सुरू आहे.

चंद्रकांत पाटलांची संजय राऊतांवर खोचक टीका, म्हणाले – ‘आमची मैत्री जंगलातल्या वाघासोबत, पिंजऱ्यातल्या नाही’

Neem Juice : जेवढं कडू तेवढंच फायदेशीर, आजारांना जवळ देखील येऊ नाही देत; जाणून घ्या

Wab Title : Murder in Pune | Shocking ! In Pune, the son, fed up with his father’s illness, slashed his father’s throat with a blade; The police smiled