home page top 1

सांगलीत जमिनीच्या वादातून कुऱ्हाडीने सपासप वार करून एकाचा खून

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – जत तालुक्यातील सुसलाद येथे शेत जमिनीच्या वादातून एकाचा कुऱ्हाड, काठ्या, धारधार हत्याराने हल्ला करून निर्घृण खून करण्यात आला. रविवारी दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली. बसंवतराय ऊर्फ निंगाप्पा बन्नी (वय 56) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. उमदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बन्नी याच्या भावकितीलच पाच जणांनी हा खून केल्याचे पोलिसांनी सांगितले.

कांतू शिदरीया बन्नी , मुदका मलकाप्पा बन्नी,  राजेंद्र मल्लाप्पा बन्नी, रावतू मल्लाप्पा बन्नी, विटाबाई बन्नी यांनी केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी निंगाप्पा बन्नी याचा भाऊ श्रीशैल बन्नी याने उमदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पाच जणांवर संशय व्यक्त केला आहे.

सुसलाद येथे सावंत वस्ती जवळ बन्नी कुटुंबीयांची वस्ती आहे. बसवंत उर्फ निंगाप्पा बन्नी याचा भावकितीलच लोकांशी शेत जमिन व घर बांधण्यावरून वाद होता. शेताच्या वादातून या दोन कुटुंबात अनेक वेळा परस्परविरोधी तक्रारीही केल्या आहेत. जमिनीच्या वादातून बारा वर्षांपूर्वी त्यांच्यात मोठा वाद झाला होता.

रविवारी निंगाप्पा शेतात काम करत असताना संशयितांनी हल्ला केला.  कुऱ्हाड, काठ्या, दगड, लाथा बुक्क्यांनी निंगाप्पा यांना जबर मारहाणं करण्यात आली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या बन्नी याला रुग्णालयात नेत असताना त्याचा वाटेतच मृत्यू झाला. पुढील तपास उमदी पोलीस करीत आहेत.

आरोग्य विषयक वृत्त – 

आहारा संबंधीचे काही ‘समज-गैरसमज’, जाणून घ्या ‘सत्य’

मसाल्याचे पदार्थ आरोग्यासाठी लाभदायक, होतात अनेक फायदे

स्लीम व्हायचंय का ? या उपायांनी सहज कमी होईल पोट

‘हे’ उपाय केले तर चष्मा लागणार नाही, नंबर वाढणार नाही

Loading...
You might also like