home page top 1

तळेगाव परिसरात तरुणाचा खून

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात इंदोरी ते जांभोळे गावाच्या दरम्यान रस्त्याच्या कडेला एका तरुणाचा मृतदेह आढळला. लोखंडी शस्त्राने डोक्यात वार करून तरुणाचा खून केल्याचा प्रकार समोर आला असून तरुणाची ओळख अदयाप पटली नाही. हा प्रकार मंगळवारी सकाळी आठच्या सुमारास उघडकीस आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदोरी ते जांभोळे गावाच्या दरम्यान रस्त्याच्या कडेला अज्ञात इसमाचा मृतदेह असल्याची माहिती मंगळवारी सकाळी आठच्या सुमारास तळेगाव एमआयडीसी पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. एका तरुणावर मृतदेह आढळून आला, तरुणावर लोखंडी शस्त्राने वार केले असून डोक्यावर आणि पोटावर गंभीर जखमा झाल्या आहेत. खून झालेल्या तरुणाची अद्याप ओळख पटली नाही. तपास तळेगाव एमआयडीसी पोलीस करत आहेत.

Loading...
You might also like