Pune News : तळेगाव ढमढेरे येथे दिवसाढवळ्या खून, प्रचंड खळबळ

शिक्रापूर : शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येेथे भर रस्त्यात दिवसाढवळ्या Murder खुनाचा Murder प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणातील आरोपीला एक तासांच्या आतच शिक्रापूर पोलिसांनी जेरबंद केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,दि.५ रोजी दुपारी ०१:४५ च्या सुमारास तळेगाव ढमढेरे गावाच्या हद्दीत तळेगाव- न्हावरा रोडच्या बाजूस शासकीय गोडाऊन जवळ प्रतिभा दूध डेअरी समोर एक अनोळखी व्यक्तीने एका अनोळखी व्यक्तीने डोक्यावर व कपाळावर दगडाने मारून हत्या  केल्याबाबतची फिर्यादीवरून शिक्रापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

सदर गुन्ह्यांचे गांभीर्य ओळखून अभिनव देशमुख पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक व मिलिंद मोहिते अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग,
पुणे ग्रामीण यांनी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे राहुल धस,उपविभागीय पोलिस अधिकारी दौंड विभाग यांनी तात्काळ गुन्हा घडलेल्या ठिकाणी भेट देऊन
पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांना तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

शिक्रापूर पोलिसांनी या कामी तात्काळ तपास पथके नेमण्यात आली.

पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवित या घटनेतील संशयित आरोपी हरीश सुधाकर काळे
( वय २५ वर्ष ,रा. खंडोबाची आळी तळेगाव ढमढेरे ता. शिरूर जि. पुणे) याला ताब्यात घेतले.

पोलीसांनी या वेळी अधिक चौकशी केली असता आरोपीने सदरचा गुन्हा अनैतिक संबंधाच्या कारणावरून केला
असल्याचे पोलिसांना सांगितले व यातूनच नवनाथ संपत चौधरी
( रा. पाबळ,ता.शिरुर, जि. पुणे) याचा दगडाने मारून खून केल्याची माहिती पोलिसांना दिली.

हा तपास शिक्रापूर पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे,सहायक पोलिस निरीक्षक विक्रम साळुंखे,शिवराम खाडे, राजेश माळी,पो.हवा. पंडित मांजरे, जितेंद्र पानसरे,दत्तात्रय शिंदे,अजिनाथ शिंदे,पो.ना.अमोल चव्हाण, अमोल दांडगे,श्रीमंत होनमाने, संतोष शिंदे, पो. कॉ. महेंद्र पाटील, भरत कोळी, शिवाजी चिताळे, राहुल वाघमोडे, जयराज देवकर, लक्ष्मण शिरसकर यांनी केला.

या प्रकरणी अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक राजेश माळी करीत आहेत.

पुण्यातील शास्त्रज्ञ दाम्पत्यासह 3 शास्त्रज्ञांमुळे पुन्हा चीनकडे संशयाची सुई, वुहानच्या लॅबमध्येच बनवला गेला कोरोना व्हायरस?

 

जाणून घ्या कोणत्या कारणामुळं हातांना आणि तळव्यांना जास्त घाम येतो, ‘हे’ उपाय आवश्य करा

 

‘अनलॉक’च्या निर्णयावर गोंधळ का झाला ?; CM ठाकरेंनी केलं स्पष्ट

 

दातांना किड लागली असल्यास ‘हे’ घरगुती उपाय करा, अगदी सहजपणे समस्या होईल दूर; जाणून घ्या

 

मान्सून महाराष्ट्रात दाखल, हवामान खात्याची माहिती