home page top 1

धारदार शस्त्राने सपासप वार करुन मेस चालकाचा खून

मुरबाड : पोलीसनामा ऑनलाइन (अरुण ठाकरे) – धारदार शस्त्राने सपासप वार करुन मेस चालकाचा खून केल्याची घटना नवीन ठाणे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काल्हेर भागात घडली आहे. सदानंद भोईर (४७, दिप लक्ष्मी कॉम्प्लेक्स, काल्हेर, ठाणे, मुळ गाव- शेलारी, मुरबाड) असे खून झालेल्या मेस चालकाचे नाव आहे. या प्रकरणी अज्ञात मारेकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदाशिव भोईर हे मुळचे मुरबाड तालुक्यातील शेलारी गावचे आहेत. ते आपल्या कुटूंबासोबत ठाणे येथील काल्हेर मधील दिप लक्ष्मी काॅम्प्लेक्स मध्ये राहत होते. काॅम्प्लेक्सजवळच ते खाणावळ चालवत होते. खाणावळीत मोठ्या प्रमाणात गोदाम कामगार जेवणासाठी येत असत. शुक्रवारी रात्री अज्ञात मारेकऱ्यांनी धारदार शस्त्राने वार करुन भोईर यांचा खून केला. त्यानंतर मृतदेह तेथेच गाळ्यात टाकून कुलूप लावून मारेकरी पसार झाले. रविवारी रात्री परिसरातील नागरिकांना गाळ्यातून दुर्गंधी येत होती.

गाळ्याचे कुलूप तोडून पाहिल्यानंतर आतमध्ये भोईर यांचा मृतदेह आढळून आला. भोईर यांच्या गळ्यावर व हातावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते. घटनेची माहिती मिळताच नारापोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी नारापोली पोलीस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खाणावळीत येणाऱ्या कामगारासोबत वाद झाले असावेत आणि त्यातूनच भोईर यांचा खून झाला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.  पुढील तपास नारापोली पोलीस करत आहेत.

अकाली केस ‘पांढरे’ का होतात ? जाणून घ्या कारणे

कष्टाची कामे न करणाऱ्यांनी ‘लठ्ठपणा’ असा कमी करावा

‘या’ 5 प्रमुख कारणांमुळे हातापायांना ‘मुंग्या’ येतात, जाणून घ्या ‘उपाय’

‘स्पर्म काऊंट’ वाढवण्यासाठी मध आणि आवळा ‘रामबाण’ उपाय ; ‘असे’ करा सेवन !

जेवणानंतर ‘या’ गोष्टींचे सेवन कटाक्षाने टाळा ; अन्यथा …

अ‍ॅसिडीटीला मुळापासून संपवा, करा ‘हा’ नैसर्गिक उपाय

 

Loading...
You might also like