प्रेम प्रकरण नव्हे, ब्लॅकमेलिंगमुळे झाली होती तरूणाची हत्या, पोलिसांनी केला खुलासा

देवरिया : उत्तर प्रदेशच्या देवरियामध्ये झालेल्या हत्येचा खुलासा पोलिसांनी केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना गजाआड केले आहे. अगोदर हे प्रकरण प्रेमसंबंधाचा त्रिकोण असल्यासारखे वाटत होते. परंतु, संपूर्ण कथा अनैतिक संबंध आणि ब्लॅकमेलिंगचे आहे. पकडण्यात आलेली महिला आरोपी आणि मृताचे अनैतिक संबंध सुद्धा समोर आले आहेत. मात्र, मृत काला साहनीवर आरोप आहे की, तो या महिलेला ब्लॅकमेलिंग करून तिचे लैंगिक शोषण करत होता.

मईल, भागलपुर येथील रहिवाशी काली साहनी 11 डिसेंबरला शेजारच्या छितुपुर गावात ऑर्केस्ट्रा पाहण्यासाठी गेला होता. दुसर्‍या दिवशी सकाळी त्याचा मृतदेह सरयू नदीत सापडला होता. तपासादरम्यान पोलिसांना एक तरूण आणि तरूणीवर संशय आला होता. दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता संपूर्ण घटनाक्रम स्पष्ट झाला.

तरूणाच्या हत्येचे रहस्य उघड
रोहित उर्फ राजू आणि मृतक काली साहनीचे एकाच महिलेसोबत अनैतिक संबंध होते. परंतु, रोहितला हे अजिबात पसंत नव्हते की, कालीचे संबंध सुद्धा त्या महिलेसोबत आहेत. नंतर 11 डिसेंबरच्या रात्री महिलेने कालीला घरी भेटण्यासाठी बोलावले. जिथे रोहित अगोदरच उपस्थित होता आणि दोघांमध्ये या गोष्टीवरून वाद झाला. यानंतर तिघेही सरयू नदीच्या किनार्‍यावर पोहचले आणि रोहितने कालीला हातात गंगाजल घेऊन शपथ दिली की, तू या तरूणीशी प्रेम करत नाही आणि तिला कधीही भेटणार नाही.

कालीने शपथ सुद्ध घेतली, परंतु रोहित आणि महिलेला खरे वाटले नाही. मग पुन्हा दोघांमध्ये भांडण वाढले आणि रोहितने धारदार हत्याराने कालीवर हल्ला करून त्याला ठार केले. महिलेचा विवाह काही वर्षापुर्वी झाला होता, परंतु रोहितचे प्रेमसंबंध त्या अगोदरपासून होते. रोहित या महिलेला भेटण्यासाठी तिच्या घरी आसामला पोहचला होता. ज्यानंतर सासरच्यांनी महिलेला सोडून दिले आणि ती आपल्या माहेरी येऊन राहात होती.