विवाहीतेचं 2 वर्षांनी लहान तरूणावर जडलं ‘मन’, 3 महिन्याच्या ‘प्रेग्नंट’ महिलेचा फोनमुळं ‘पर्दाफाश’

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – विवाहित असूनही आपल्यापेक्षा लहान असलेल्या तरुणावर प्रेम करणाऱ्या महिलेला आपला प्राण गमवावा लागला आहे. तीन महिन्यांची गरोदर असताना त्याने तिला फोनवर बोलताना पाहिले आणि सुरु झाले संशयाचे वादळ. अखेरीस या संशयाने तीचा बळी घेतला. पोलिसांनी सक्षमता दाखवत काही तासांमध्येच आरोपीला अटक केली.

काय आहे नेमका प्रकार
काळुस्ते ग्रामपंचायत हद्दीतील फोडसेवाडी येथील कविता सनू पारधी हीचे गावातील दीपक चिमा गिरे या तरुणाशी प्रेमसंबंध जुळलेले होते. कविता आपल्याव्यतिरिक्त अन्य कोणाशीतरी बोलत असल्याचा त्याला संशय आला आणि त्याने तीला त्याबाबत विचारले देखील परंतु तिने माझ्याशी लग्न कर. . मग सांगेन असे सांगितले.

त्यानंतर दिपकने तिला धाम धरणावर नेले आणि यावेळी दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. त्यावेळी त्याला राग अनावर झाला. १३ नोव्हेंबरच्या रात्री अकरा वाजता दगडावर डोके आपटून त्याने तिला ठार केले. त्यानंतर आरोपीने आपले काका पुना सोमा गिरे यांच्या मदतीने कविताला दरीत फेकून दिले.

पाच तासात पोलिसांनी लावला छडा
घोटी पोलीस स्टेशनमध्ये एका गुराख्याकडून एका मृतदेहाबाबत माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस निरीक्षक आनंद माळी यांनी माहिती घेतली असता ती कविताच असल्याचे समजले. कवितांच्या नातेवाईकांकडून देखील कविता बेपत्ता असल्याची तक्रार इगतपुरी पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली होती.

पोलिसांना तपासात कविताचे प्रेमसंबंध असल्याची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ दीपक गिरेला अटक केली. पोलिसांनी आपला खाक्या हिसका दाखवताच दिपकने सर्व कबूल केले. उपअधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच पोलिसांना यादरम्यान काका पुना गिरे यांच्याविरोधात देखील पुरावे मिळाल्याने पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

Visit : Policenama.com