home page top 1

खळबळजनक ! कोचिंग क्लास चालकाचा चॉपरने सपासप वार करून खून

घाटकोपर : पोलीसनामा ऑनलाइन – घाटकोपर येथील मयंक ट्यूटोरियलच्या मालकाचा चॉपरने सपासप वार करून खून केल्याची खळबळजन घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पतंगनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. मयंक मंडोप असे मृत ट्युटोरियल मालकाचे नाव आहे. हा खून कर्मचारी गणेश पवार याने क्लासमध्येच केला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. ही घटना आज (रविवार) सांयकाळी साडेसहाच्या सुमारास घडली.

मयांक मांडोर यांचा घाटकोपर पंतनगर परिसरात मयांक ट्युटोरिअल नावाचा कोचिंग क्लास आहे. मयांक यांनी त्यांच्या क्लासमधील गणेश पवार या कर्मचाऱ्याला कामावरून काढले होते. आज सायंकाळी गणेश मयांककडे पगार घेण्यासाठी आला होता. यावेळी दोघांमध्ये विद्यार्थ्यांसमोरच बाचबाची झाली. प्रकरण हातघाईवर आल्यावर गणेशने रागाच्या भरात मयांकवर चॉपरने सपासप वार केले.

यामध्ये मयंक हे गंभीर जखमी झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे क्लासमधील विद्यार्थ्यांची एकच धावपळ झाली. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील स्थानिक लोकांनी क्लासभोवती गर्दी केली. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले आहे. तर मृत मयांक यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Visit – policenama.com 

Loading...
You might also like