प्रियकरासाठी ‘त्या’ टॉप मॉडेलने बदलला धर्म, त्यानेच केला तिचा निर्घृण खून

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या एका १९ वर्षीय मॉडेलचा निर्घृण खून केल्याची घटना नागपूरमध्ये उघडकीस आली आहे. मृत मॉडेल मिस इंडीया २०१९ च्या अंतीम फेरीत दाखल झाली होती. तिने ३ जुलै २०१९ रोजी प्रियकरासाठी धर्म बदलला. मात्र, त्यांच्यात झालेल्या किरकोळ वादावरून प्रियकराने तिचा निर्घृण खून केला. मृतदेहाची ओळख पटू नये यासाठी त्याने तिचा चेहरा विद्रुप केला. मात्र, नागपूर ग्रामीण पोलिसांनी तिच्या हातावर असलेल्या टॅटूवरून गुन्ह्याचा छडा लावून आरोपी प्रियकराला अटक केली.

खुशी जगदीश परिहार (वय १९, वेलकम सोसायटी, हजारी पहाड) असे मृताचे तर अशरफ अफसर शेख (वय २१, रा. आयबीएम रोड, गिट्टीखदान) असे अटकेतील प्रियकराचे नाव आहे. खुशी ही बी.कॉम. द्वितीय वर्षाला शिकत होती. अशरफचे झिंगाबाई टाकळी परिसरात कट झोन नावाचे सलून आहे. तो कुख्यात तस्कर अफसर अंडा याचा मुलगा आहे.

मागील अनेक दिवसांपासून खुशी अशरफ सोबत लिव्ह इनमध्ये रहात होती. त्यांनी लग्न करण्याचे निश्चित केले होते. मात्र, खुशी दुसऱ्या तरुणांसोबत फिरत असल्याचे अशरफला खटकले. यावरून दोघांमध्ये वाद होऊ लागले. घटनेच्या दिवशी अशरफने खुशील लाँग ड्राईव्हच्या बहाण्याने सावनेरमार्गे पांढुर्णा मार्गावरील सावली परिसरात नेले. याठिकाणी पुन्हा दोघांमध्ये वाद झाले. चिडलेल्या अशरफने टॉमीने तिच्या डोक्यात वार केले. त्यात ती बेशुद्ध झाली. एवढ्यावरच तो थांबला नाही तर त्याने खुशीचा चेहरा दगडाने ठेचला.

टॅटूवरून पटली ओळख

शनिवारी केळवद-पांढुर्णा मार्गावरील सावली भागात एका तरुणीचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरु केला. मृतदेहाच्या छातीवर आणि हातावर असलेल्या टॅटूवरून मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम पोलिसांनी सुरु केले. टॅटू असलेले छायाचित्र पोलिसांनी सोशल मीडियावर व्हायरल केल्यानंतर मृतदेह खुशी परिहारचा असल्याची खात्री पोलिसांना झाली. फुटाळा भागात पोलिसांनी तिचे छायाचित्र येथील दुकानदारांना दाखविले. एका पानठेला चालकाने ती खुशी असल्याचे सांगितले. खुशीच्या हातावर असलेले खुशी आणि आशू या टॅटूवरून पोलिसांना तपासाची दिशा गवसली.

तसेच खुशीच्या अंगावर असलेल्या टी-शर्टवर बार कोड पोलिसांना दिसला. पोलिसांनी तपास केला असता नागपूर येथील एका मॉलमध्ये दोघांनी सहा हजार रुपयांची खरेदी केली होती. याच मॉल मधून खऱेदी केलेला काळ्या रंगाचा टी-शर्ट खुशीने घातला होता. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून गुन्ह्यात वापरलेली कार जप्त केली आहे.

आरोग्यविषयक वृत्त

‘हा’ योगा केल्याचे ४ फायदे, वेळोवेळी पाणी पिण्याची नाही गरज

‘हे’ उपाय केल्याने चेहरा होईल ‘चमकदार’ ; फेशिअलची गरज नाही

अनेक आजारांवर प्राचीन काळातील ‘हे’ २४ ‘रामबाण’ उपाय, जाणून घ्या

समृद्ध आरोग्यासाठी ‘शीर्षासन’

तळपायांना होतात हे आजार, जाणून घ्या

उलट्यांचा त्रासाने प्रवास टाळत असाल तर करा ‘हे’ ४ उपाय

लिंबू पाणी पिण्याचे ‘हे’ ७ फायदे

पेनकिलर ऐवजी ‘हे’ घरगुती उपाय करा, तत्काळ ‘रिलीफ’ मिळेल

पोटदुखीसह त्वचा आणि केसांच्या समस्यांवर ‘हे’ गुणकारी औषध, जाणून घ्या

‘ही’ ४ झाडे विविध आजारांवर उपयोगी, जाणून घ्या

 

Loading...
You might also like