आई आणि बहिणीवर ठेवत होता ‘नजर’, हटकलं तर त्यानं केले ‘तुकडे-तुकडे’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंजाब मधील गुरुदासपूर येथे एक खळबळजनक घटना घडली आहे. एक व्यक्ती एका मुलीला आणि तिच्या आईला वाईट नजरेने पाहत होता. त्या मुलीच्या भावाने त्याला विरोध केला तर त्या व्यक्तीने तिच्या भावाची क्रूर पद्दतीने हत्या केली. पहिल्यांदा त्याने मुंडके धडापासून वेगळे केले आणि बाकी भागाचे तुकडे तुकडे करून एका पोत्यात भरून नाल्यात फेकून दिले.

गुरुदासपूरमध्ये पोलिसांना एका नाल्यात बिना शीर असलेला मृतदेह सापडला आहे. सोमवारी पोलिसांनी या खुनाचे रहस्य उलगडले असल्याचे सांगितले. याबाबत पोलिसांनी खुनाच्या आरोपावरून बटाला येथून एका व्यक्तीला अटक केली आहे.

मृतक व्यक्ती गांधी कॅम्प येथे राहणार होता तर ज्याला पोलिसांनी अटक केली तो ही त्याच परिसरातील रहिवासी आहे. १९ सप्टेंबरला ही घटना घडली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार मृतक व्यक्ती रजिंदर याच्या बहिणीवर आणि आईवर आरोपी अशोक कुमार याची वाईट नजर होती ज्यावेळी राजिंदर ने अशोक कुमारला विरोध केला त्यावेळी त्याने रजिंदरचा खून केला. आपला गुन्हा पकडला जाऊ नहे यासाठी अशोकने रजींदरचे शीर धडा वेगळे केले आणि मृतदेहाचे तुकडे तुकडे करून त्याला नाल्यात टाकले.

Visit : policenama.com