धक्कादायक ! शरीरसुखास नकार दिल्याने दिराने सपासप वार करुन केला भावजईचा ‘खुन’, पुरंदरमधील घटना

जेजुरी : पुरंदर तालुक्यातील जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मौजे रीसे या गावातील एका व्यक्तीने आपल्या भावजईचा खून केल्याची घटना घडली आहे . या बाबतची तक्रार खून झालेल्या महिलेच्या मुलीने जेजुरी पोलीस स्टेशनला दिली आहे . याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की , रीसे येथील मुबारक कादर सय्यद हा त्याची भावजई शाबीरा जैनुद्दीन सय्यद ( वय ४५ ) हिच्याकडे वारंवार शरीरसुखाची मागणी करत होता . परंतु ती त्यास तयार होत नसल्याने काल दिनांक २१ / ९ / २०२० रोजी रात्रीचे जेवण झाल्यानंतर शाबीरा खरकटी भांडी घासत असताना मुबारक कादर सय्यद याने घराची बाहेरची कडी लावून शाबीराकडे गेला . त्यावेळी घरातून शाबिराची मुलगी हसीना व घरातील लोकांनी मुबारकला तू काय करत आहेस? दरवाजा उघड म्हणून समजावले परंतु त्याने दरवाजा उघडला नाही . शाबीराकडे शरीर सुखाची मागणी केली . त्यास तिने नकार दिल्याने मुबारक कादर सय्यद याने चिडुन हातातील सुरीने शबीराच्या छातीवर , डाव्या हाताच्या मनगटावर , डाव्या पायाच्या मांडीवर , डाव्या पायाच्या घोट्यावर वार करुन तिचा खून केला .

याबाबत शाबीराची मुलगी हसीना मुलाणी हिने जेजुरी पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे.जेजुरी पोलिसांनी भादंवि कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे . या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण , अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग , उपविभागीय पोलिस अधिकारी पुरंदर भोर यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने हे करत आहेत . आरोपी मुबारक कादर सय्यद हा फरार झाला असून त्याच्या शोधासाठी वेगवेगळी दोन पथके रवाना झाली असल्याची माहिती जेजुरी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांनी दिली आहे .

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like