Murder News | पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने काढला पतीचा काटा; गुगल सर्च करून रचला हत्येचा कट

पोलीसनामा ऑनलाइन – प्रेमसंबधात अडसर ठरणा-या पतीची पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने हत्या (Murder) केल्याचे निष्पन्न झाले आहे. उत्तर प्रदेशातील खेडीपूर (जि. हरदा) भागात 18 जून रोजी ही धक्कादायक घटना घडली आहे. महिलेने पतीची हत्या करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी चक्क गुगल सर्च (Google search) करून कट रचल्याचे समोर आले आहे. या घटनेने पोलीसही चक्रावून गेले आहेत.

तबस्सूम (Tabassum) असे आरोपी महिलेचे नाव आहे. तर अमिर (Amir) असे हत्या केलेल्या पतीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत अमिर हा महाराष्ट्रात कामाला होता. याच काळात तबस्सूम आणि इरफान यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. दरम्यान, लॉकडाऊन असल्याने आमिर घरी आला होता. अमिर घरी परतल्याने तबस्सूम आणि इरफान यांना भेटता येत नव्हते. त्यामुळे त्यांनी अमिरचा काटा काढण्याचा कट रचला. आमिरला दम्याचा त्रास असल्याने त्याला दररोज औषध घ्यावी लागत होती. 18 जूूनच्या रात्री तबस्सूमने आमिरला दम्याच्या नेहमीच्या गोळ्या देण्याऐवजी दुस-याच गोळ्या दिल्या. यामुळे आमिर बेशुद्ध पडला. त्यानंतर दोघांनी आमीरचे हातपाय ओढणीने बांधले. त्यानंतर आमिरचा मृत्यू होईपर्यंत इरफान हातोड्याने मारत होता असे पोलिसांनी सांगितले. हत्येनंतर तबस्सूमने यांची माहिती पोलिसांना दिली, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. चोरीच्या प्रयत्नातून हत्या झाली का याचा तपासही पोलीसांनी केला. पण, घटनास्थळी सापडलेल्या पुराव्यांमुळे पोलिसांना तबस्सूमवर शंका आली. तपासा दरम्यान तबस्सूमनेच प्रियकर इरफानला सोबत घेऊन पतीची हत्या केल्याचे उघडकीस आले.
…म्हणून अजितदादांवर गुन्हा दाखल करण्याचा प्रश्नच नाही – जयंत पाटील

हत्या कशी करायची, गुगलवर घेतला शोध
हत्येचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी सायबर सेलची मदत घेतली.
पोलिसांनी तबस्सूमच्या कॉलची माहिती घेतली.
तिने कुणाला कॉल केला आहे का याचा तपास करताना तबस्सूम आणि इरफान यांच्यात बऱ्याच वेळा संभाषण झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आलं.
त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. त्यानंतर पोलिसांनी तबस्सूमने गुगलवर काय काय शोधल याचा शोध घेतला.
त्यात तबस्सूमने हत्या कशी करायची आणि हात कशा पद्धतीने बांधायचे, मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची आदी माहिती घेतल्याचे तपासातून समोर आले आहे.
त्यानंतर तबस्सूमला पोलिसी खाक्या दाखवताच तिने गु्न्ह्याची कबुली दिली.

 

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : murder news | woman googles murder plan kills husband with lovers help

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update